When Sachin Tendulkar said no to tobacco ads
- Sachin Tendulkar’s stance on tobacco advertisements is slap on faces of Gavaskar, Kapil, Sehwag and Gayle
- Sachin Tendulkar revealed that he received several offers to promote tobacco products but refused them all
- सेहवाग व गावसकर यांना 4 वाक्यात खरंच सुनावलं?
दरवर्षी 31 मेला जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन साजरा केला जातो. यानिमित्त अनेक शहरांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले होते. अनेक ठिकाणी पथनाट्य, फ्लॅशमॉब करत, तंबाखू विरोधी घोषणा व पोस्टर्ससह मोर्चा काढून हा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त स्वतः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर एक पोस्ट शेअर केली होती. यातून समाज प्रबोधन करण्याचा भलेही सचिनचा हेतू असला तरी नेटकऱ्यांनी याचा संबंध थेट गावस्कर व सेहवाग यांच्याशी जोडून सचिन कसा या दोघांना सुनावतोय अशा चर्चा सुरु केल्या आहेत. काहींनी तर सचिन स्वतः खोटं बोलत असल्याचे म्हणत वेगळ्या बाजूने ट्रोलिंग केले आहे. चर्चेचा मुद्दा ठरलेली अशी कोणती पोस्ट सचिन तेंडुलकरने केली होती व त्यावर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत हे पाहूया..
सचिन तेंडुलकरने 31 मेला आपल्या X (पूर्व ट्विटर) अकाउंटवर पोस्ट लिहिली की, “माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीला, माझ्या वडिलांनी मला एक साधा पण महत्त्वाचा सल्ला दिला: तंबाखूला कधीही प्रोत्साहन देऊ नका. मी या सल्ल्याचे पालन करत जगलो आहे आणि तुम्हीही जगू शकता. उत्तम भविष्यासाठी तंबाखूपेक्षा आरोग्याची निवड करूया.”
At the start of my international career, my father gave me a simple yet important piece of advice: never promote tobacco. I have lived by it, and so can you. Let us choose health over tobacco for a better future.#WorldNoTobaccoDay
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 31, 2024
दरम्यान, या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तंबाखूयुक्त गोष्टींचे सेवन करणाऱ्या अन्य खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये स्वतः सुनील गावस्कर व वीरेंद्र सेहवाग यांचेही फोटो जोडलेले आहेत. सचिन सर तुम्ही या दोघांना सुनावताय का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये विचारला आहे. तर एकाने कमेंट करून सचिनच्या जुन्या विधानाचा संदर्भ देत लिहिले की, “1996 च्या विश्वचषकाच्या वेळी सचिन एकमेव फलंदाज होता ज्याने त्याच्या बॅटवर ‘फोर स्क्वेअर’ किंवा ‘विल्स’ चे स्टिकर लावले नव्हते. त्याला तंबाखूच्या ब्रँडचे समर्थन किंवा जाहिरात करायची नव्हती, म्हणूनच आज देश सचिनकडे ‘हिरो’ म्हणून पाहतो.”
दुसरीकडे यावर ‘विराट कोहली का फॅन’ या अकाऊंटवरून केलेली कमेंट मात्र चांगलीच चर्चेत आली आहे. या युजरने लिहिले की, “हा माणूस (सचिन तेंडुलकर) शुद्ध खोटारडा आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेकदा तंबाखूचा प्रचार केला आहे. अगदी 1998 मध्ये शारजाह येथे याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा ‘धुव्वा’ उडवला होता.” ही कमेंट वाचून तुमच्या लक्षात आले असेलच की चाहत्याने उपहासात अशी कमेंट केली होती पण सुरुवात वाचून अनेकांनी आपल्याला धक्का बसल्याचे कमेंटखाली लिहिले आहे.
On World No Tobacco Day, Sachin Tendulkar revealed that he received several offers to promote tobacco products but refused them all. Speaking at an event in Mumbai on Tuesday, the legendary cricketer shared how his father Ramesh Tendulkar advised him against promoting the use of tobacco.
Sachin Tendulkar tobacco advertisements
Sachin Tendulkar tobacco advertisements
Sachin Tendulkar tobacco advertisements
Sachin Tendulkar tobacco advertisements
Sachin Tendulkar tobacco advertisements
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements