One Nation, One Election
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी
देशात ‘One Nation, One Election’ बाबत केंद्र सरकार उत्साही आहे. यात राजकारण देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान नेतृत्वाखालील केंद्र सरकार यांच्या बाजूने असले तरी विरोधी पक्ष उघडपणे विरोध करत आहेत. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत निवडणूक आयोगाने सरकारला पत्र लिहिले आहे. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्यास, नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) खरेदी करण्यासाठी दर 15 वर्षांनी अंदाजे ₹ 10,000 कोटी रुपये लागतील, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे (Need ₹10,000 crore every 15 years for One Nation, One Election : EC to Centre).
आयोगाने सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ईव्हीएमच्या वापराचा कालावधी 15 वर्षांचा आहे आणि जर एकाच वेळी निवडणुका घेतल्या गेल्या तर या कालावधीत 3 वेळा निवडणुका घेण्यासाठी मशीनचा एक संच वापरला जाऊ शकतो. अंदाजानुसार, यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात एकूण 11.80 लाख मतदान केंद्रांची आवश्यकता असेल. जेव्हा लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातात, तेव्हा प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएमचे दोन संच आवश्यक असतील – एक लोकसभा जागेसाठी आणि दुसरा विधानसभेच्या जागेसाठी.
One Nation, One Election
Rs 10000 Crore Cost One Nation One Election
Rs 10000 Crore Cost One Nation One Election
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements