भारतातील दूरसंचार क्षेत्रात आपला ठसा उमटवणारा Jio आता भारताबाहेर व्यवसाय करण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Group) भारताच्या शेजारील देशाच्या दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करण्यास स्वारस्य दाखवलं आहे. तिथली सरकारी कंपनी विकत घेण्याची ते तयारी करत आहे.
भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Group) टेलिकॉम कंपनी जिओचं वर्चस्व कायम आहे. मोबाईल नेटवर्क विभागापासून ते फायबर मार्केटमध्येही ते वेगाने आपला व्यवसाय विस्तारत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 30 जून 2023 पर्यंत, रिलायन्स जिओचा भारतातील फिक्स्ड-लाइन टेलिकॉम ऑपरेटर्सचा मार्केट शेअरमध्ये 32.83 टक्के हिस्सा होता.
2023 च्या आर्थिक वर्षात वायरलेस ग्राहकांच्या बाजारपेठेत जिओचा (Reliance Group Jio) सर्वाधिक हिस्सा 36 टक्क्यांपेक्षा जास्त होता. भारतात आपला व्यवसाय वाढवणारी ही कंपनी आता भारताबाहेरही दूरसंचार क्षेत्रात स्वतःची स्थापना करण्याच्या तयारीत आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजची दूरसंचार कंपनी जिओ (Jio) प्लॅटफॉर्मने सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी श्रीलंका टेलिकॉम पीएलसीमध्ये हिस्सा खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत असलेले श्रीलंका सरकार निधी उभारण्यासाठी अर्थव्यवस्थेतील अनेक क्षेत्रांचे खाजगीकरण करण्याचा विचार करत आहे. कोलंबोने 10 नोव्हेंबरपासून संभाव्य गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव मागवले होते. 12 जानेवारीची अंतिम मुदत संपल्यानंतर, श्रीलंका सरकारने एक प्रेस नोट जारी केली, जिओ प्लॅटफॉर्म्स (Reliance Group), गॉरट्यून इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेड आणि पेटीगो कॉमर्सिओ इंटरनॅशनल एलडीए यांना तीन संभाव्य बोलीदार म्हणून नावे दिली. संपूर्ण तपशील लवकरच उघड होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
जिओ (Reliance Group) श्रीलंकेतील टेलिकॉमसह शेजारील देशाच्या बाजारपेठेत सामरिक पाऊल ठेवत आहे. ब्रोकरेज कंपनी BofA ने Jio प्लॅटफॉर्मचे मूल्य $107 अब्ज असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. BofA ने एका नोटमध्ये म्हटले आहे की, Jio Platforms यावर्षी त्याच्या प्रगत फीचर फोन JioBharat आणि वायरलेस ब्रॉडबँड डिव्हाईस JioAirFiber द्वारे बाजारपेठेत अधिक सखोल प्रवेश करेल. तसंच नवीन ग्राहक जोडत राहतील अशी अपेक्षा करते.
Reliance Group Ambani Jio Sri Lanka
Reliance Group Ambani Jio Sri Lanka
Reliance Group Ambani Jio Sri Lanka
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements