नवीन ग्राहक जोडण्यास मनाई
जुन्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?
RBI bars Paytm Payments Bank from accepting fresh deposits after Feb 29 : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India (RBI)) पेटीएम बँकेला (PayTM Bank) धक्का दिला आहे. नवीन ग्राहक जोडण्यास पेटीएम पेमेंट्स बँकेला मनाई केली आहे. आरबीआयने 31 जानेवारी रोजी आदेश जारी केले आहेत. त्याशिवाय, 29 फेब्रुवारीनंतर सध्या असलेल्या ग्राहकांना बँकेत रक्कम जमा करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
restrictions on Paytm Payments Bank including accepting fresh deposits and doing credit transactions after February 29 : भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सिस्टिम ऑडिट रिपोर्ट आणि त्यानंतरच्या काही रिपोर्टमध्ये कंपनीने सातत्याने आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याची बाब समोर आली आहे. त्याशिवाय, पेटीएम बँकेशी संबंधित आणखी काही गंभीर बाबी समोर आल्या असून भविष्यात आणखी आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूतोवाचही आरबीआयने केले आहे.
29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही ग्राहकांच्या खात्यांमध्ये प्रीपेड सेवा, वॉलेट्स, FASTags, NCMC कार्ड्स इत्यादींमध्ये रक्कम जमा करणे, टॉप अप करणे, क्रेडिट व्यवहार करता येणार नाही. मात्र, व्याज जमा होणे, कॅशबॅक किंवा इतर बाबींवरील परतावा ग्राहकांच्या खात्यात जमा होईल असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे (RBI barred Paytm Payments Bank from onboarding new customers.).
दरम्यान, पेटीएम बँकेवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही पेटीएम बँकेवर आरबीआयने कारवाई केली होती. केवायसीच्या नियमांचा भंग केल्याने रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यापूर्वीच Paytm ला मोठा दंड ठोठावला होता. आरबीआयनं पेटीएम पेमेंट्स बँकेला 5.39 कोटी रुपयांचा दंड सुनावला होता. आरबीआयने यापूर्वी 2021 मध्येही पेटीएम बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यावेळी पेटीएमने काही नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला होता. त्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा आरबीआयने पेटीएमवर कारवाईचा बडगा उगारला.
RBI bars Paytm Payments Bank
RBI bars Paytm Payments Bank
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements