प्राणप्रतिष्ठा सोहळ्यालाही न्यायालयात आव्हान
अलाहाबाद : अयोध्या येथील राम जन्मभूमीचा वाद सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर निकाला देत ही राम जन्मभूमी असल्याचा निकाल दिला. न्यायालयाच्या या निकालानंतर येथे आता भव्य असे राम मंदिर बांधण्यात येत आहे. येत 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. मात्र, या सोहळ्याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बंदी घालण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे (प्राणप्रतिष्ठेआधी राम लल्लाच्या डोळ्यावर पट्टी)
अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये मंगळवारी रामललाचा प्राणप्रतिष्ठा अभिषेक सोहळा सुरू झाला. यावेळी मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विधी पार पडले. एकीकडे हे विधी सुरु असतानाच आता 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे (Ram Mandir inauguration : Plea in Allahabad High Court against ‘Pran Pratishtha’ ceremony on Jan 22). उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील भोला दास यांनी ही याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेत असे म्हटले आहे की, ’22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. रामललाची मूर्ती निर्माणाधीन मंदिरात बसवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूजा करणार आहेत.
शंकराचार्य यांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. पौष महिन्यामध्ये कोणतेही धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत. मंदिर अद्याप पूर्ण झालेले नाही. अपूर्ण मंदिरामध्ये कोणतीही देवता विराजमान होत नाही. त्यामुळे हा प्राण प्रतिष्ठा सोहळा हा सनातन परंपरेविरोधात आहे असे या याचिकेमध्ये म्हटले आहे. तसेच, भारतीय जनता पक्षाने निवडणूक फायद्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचा दावाही यात करण्यात आला आहे.
दरम्यान, अयोध्येच्या राम मंदिरात मंगळवारी रामललाचा अभिषेक सोहळा सुरू झाला. या काळात मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नीच्या नेतृत्वाखाली अनेक विधी पार पडले. मंगळवारपासून सुरू झालेल्या विधींची सांगता नवीन मंदिरातील रामललाच्या मूर्तीच्या अभिषेकाने होईल. राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे विधी सुरू झाले आहेत ते 22 जानेवारीपर्यंत चालतील. 11 पुजारी सर्व ‘देवी-देवतांना’ आमंत्रण देणारे विधी करत आहेत. मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि त्यांची पत्नी उषा मिश्रा हे या महिन्याच्या २२ तारखेपर्यंत चालणाऱ्या या विधीचे यजमान आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
Ram Mandir inauguration Plea in High Court. Ram Mandir inauguration Plea in High Court
Ram Mandir inauguration Plea in High Court
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements