Ram Janmabhoomi Postage Stamp : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे प्रसिद्ध केली आहेत. यासोबतच जगभरात श्रीरामावर आधारित टपाल तिकिटांचे कलेक्शन असणाऱ्या एका पुस्तकाचं देखील प्रदर्शन करण्यात आलं. आज श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठा अभियानातील आणखी एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित 6 टपाल तिकिटे प्रसिद्ध करण्यात आली. तसंच, जगभरात श्रीरामावर आधारित असणाऱ्या सर्व टपाल तिकिटांचा एक अल्बम प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निमित्ताने मी देशातील सर्व नागरिकांचं आणि जगभरातील राम भक्तांचं अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली.
कसं आहे टपाल तिकीट? : या टपाल तिकिटावर श्रीराम मंदिर, ‘मंगल भवन अमंगल हारी’ ही ओळ, सूर्य, शरयू नदी आणि मंदिराच्या आजूबाजूच्या मूर्ती दाखवण्यात आल्या आहेत. इतर तिकिटांमध्ये श्रीराम मंदिर, भगवान गणेश, श्री हनुमान, जटायू, केवटराज आणि माता शबरी यांचा समावेश आहे. या तिकीटाच्या डिझाईनमधून आकाश, हवा, अग्नी, पृथ्वी आणि जल असे पंचमहाभूत दिसत आहेत.
#WATCH | Prime Minister Narendra Modi says "Today, I got the opportunity to join another event organised by Shri Ram Mandir Pran Pratishtha Abhiyan. Today, 6 Commemorative Postage Stamps on Shri Ram Janmbhoomi Mandir and an album of stamps issued on Lord Ram around the world have… https://t.co/cgSOT6MGZy pic.twitter.com/QmdB0PrGrL
— ANI (@ANI) January 18, 2024
पुस्तकात कोणकोणत्या देशांचा समावेश? : यासोबत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामध्ये विविध देशांमधील श्रीरामावर आधारित टपाल तिकिटांचा समावेश आहे. 48 पानांच्या या पुस्तकामध्ये अमेरिका, न्यूझीलंड, सिंगापूर, कॅनडा, कंबोडिया, श्रीलंका, फिजी अशा सुमारे 20 देशांचा समावेश आहे. यासोबतच युनायटेड नेशन्सच्या तिकिटाचा देखील यात समावेश करण्यात आला आहे.
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements