- LPG Commercial Cylinder Prices Slashed
- Prices of 19-kg cylinders slashed by ₹69.50
- Commercial LPG cylinder price reduced by Rs 69.50
- घरगुती सिलिंडरसाठी तूर्तास कोणताही दिलासा नाही
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत असताना सिलिंडर वापरकर्त्यांना गिफ्ट देण्यात आले आहे. ऑईल मार्केटिंग कंपनीने एलपीजी सिलिंडरच्या किंमती 72 रुपयांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा म्हणाला लागेल. 1 जूनपासून हे नवे दर लागू झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलिंडर दिल्लीमध्ये 69.50 रुपये, कोलकातामध्ये 72 रुपये, मुंबईमध्ये 69.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 70.50 रुपये स्वस्त झाला आहे.
किंमतीमधील ही घट फक्त व्यावसायिक सिलिंडरसाठी असणार आहे. घरगुती सिलिंडरसाठी तूर्तास कोणताही दिलासा नसून ते जुन्याच दरांमध्ये मिळतील. निवडणुकीच्या सातव्या म्हणजे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहेत. त्यातच 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडर वापरकर्त्यांना दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. दिल्लीमध्ये 1745.59 रुपयांना सिलिंडर मिळत होता, तो आता 1676 रुपयांना मिळेल. कोलकातामध्ये 1859 रुपयांना मिळणारे सिलिंडर 1787 रुपयांना मिळेल. विशेष म्हणजे आज पश्चिम बंगालमध्ये मतदान आहे.
मुंबईमध्ये कालपर्यंत 1698.50 रुपयांना असणारे सिलिंडर आजपासून 1629 रुपयांना मिळेल. चेन्नईत सिलिंडर 1840.50 रुपयांना मिळेल, तो आधी 1911 रुपयांना मिळत होता. त्यामुळे 19 किलो सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्या लोकांनासाठी ही आनंदाची गोष्ट मानावी लागेल. योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्ये गॅस सिलिंडरची किंमत 1846 रुपये असेल. मात्र, 14 किलोच्या घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 865 रुपये आहे. त्यामुळे 14 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीमध्ये घट होण्यासाठी सर्वसामान्यांना अद्याप प्रतीक्षाच करावी लागेल.
Prices of 19-kg cylinders slashed by ₹69
Prices of 19-kg cylinders slashed by ₹69
Prices of 19-kg cylinders slashed by ₹69
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements