Video : plane crashed on Florida highway
Viral Video : अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये विमान कोसळल्याची दुर्घटना १० फेब्रुवारी रोजी घडली होती. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विमान कसं कोसळलं, याचा व्हिडीओ समोर आला आहे. पायलटने Florida हायवेवर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याची प्रयत्न केला (Bombardier Challenger 600 jet). त्यावळी ही दुर्घटना घडली. हायवेवरुन जात असलेल्या वाहनाच्या डॅश कॅमेऱ्यात ही थरारक घटना कैद झाली आहे. (jet that crashed on Interstate 75 in southwest Florida)
व्हिडीओत दिसतंय त्यानुसार, विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना हे विमान एका कारला धडकलं. यानंतर क्षणात विमानाने पेट घेतला. या प्रायव्हेट जेटमध्ये 5 जण प्रवास करत होते. विमानातील तीन जण वाचले तर इतर दोघांचा मृत्यू झाला, अशी माहिती एनटीएसबी आणि फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशने दिलीय (Viral Video).
WATCH
New dash cam video shows Friday's plane crash on I-75 in Naples, Florida pic.twitter.com/hm0KPkJntA
— Insider Corner (@insiderscorner) February 13, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, हवेत असताना विमानातील दोन्ही टर्बोफॅन इंजिनमध्ये बिघाड झाला होता. याची माहिती पायलटने रेडिओवर दिली होती. नैऋत्य फ्लोरिडाच्या गल्फ कोस्टवरील नेपल्सजवळ इंटरस्टेट ७५ वर क्रॅश झाल्यानंतर विमानाला आग लागली. विमान दुर्घटनाग्रस्त झाले त्यावेळी हे विमान नेपल्स विमानतळाजवळ होते. घटनास्थळावरील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, काही सेकंदातच विमानाने एका कारला धडक दिली. या धडकेत कारचा चुराडा झाला. काही वाहन चालकांनी विमान खाली कोसळत असल्याचं पाहताच वाहनातून उतरत दुसऱ्या बाजूला पळ काढला.
plane crashed on Florida highway
plane crashed on Florida highway
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements