Pakistan Election Results 2024
पाकिस्तानातील निवडणूकांचे निकाल जाहीर झाले आहे. तुरुंगात असूनही इमरान खान यांच्या पक्षाचे समर्थन दिलेल्या उमेदवारांना सर्वाधिक जागा मिळाली आहे. त्यामुळे जादा जागा मिळूनही इमरान यांच्या पक्षाचे भवितव्य अंधारात आहे. नवाझ शरीफ आणि बिलावल भुट्टो झरदारी यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इमरान यांचा पक्ष पीटीआयने निवडणूकांमध्ये गडबड झाल्याचा आरोप करीत निदर्शने सुरु केली आहेत. निवडणूकांचे निकाल पाहाता पाकिस्तानात पुन्हा एकदा तेथील आर्मीच किंगमेकर ठरणार असे स्पष्ट झाले आहे.
इमरान खान अनेक दिवसांपासून जेलमध्ये आहेत, त्यांच्या नेत्यांविरोधात कारवाई होत आहे. निवडणूक आयोगाने इमरान यांच्या पक्षाचे चिन्ह त्यांच्याकडून हिसकावले आहे. त्यामुळे पीटीआय पार्टीच्या उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली आहे. तरीही अनेक अडचणी येऊन पाकिस्तानच्या जनतेने इमरान खान यांना पाठिंबा दिला आहे. इमरान खान यांच्या पार्टीच्या सदस्यांनी अपक्ष निवडणूक लढवूनही 101 जागांवर विजय मिळविला आहे. तर नवाझ शरीफ यांची पार्टी पीएमएल-एनला 75 आणि बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पीपीपी पार्टीला 54 जागांवर विजय मिळाला आहे. पाकिस्तानमध्ये 265 असेंब्लीच्या जागांवर निवडणूक झाली होती. 133 हा बहुमचा आकडा आहे. परंतू कोणत्याही पार्टीला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही.
National Assembly, independents won 101 seats, according to the preliminary results. The PML-N led by former prime minister Nawaz Sharif got 75 seats, while the PPP of former foreign minister Bilawal Bhutto-Zardari grabbed 54 and the MQM-P secured 17 seats.
Independent : 101 Pakistan Tehreek-e-Insaf (PTI)
PML-N : 75 Pakistan Muslim League-Nawaz (PML-N)
PPP : 54
MQM-P : 17
Jamiat Ulema-e-Islam (JUI) : 4
PML-Quaid : 3
Istehkam-e-Pakistan Party (IPP) : 2
Balochistan National Party (BNP) : 2
To form a government, a party must win 133 seats out of 265 contested seats in the National Assembly.
पाकिस्तानात आता काय होणार?: पाकिस्तानात आता नवाझ शरीफ आणि बिलावल भुट्टो यांच्या पार्टीत युती होऊ शकते असे म्हटले जात आहे. परंतू अंतिम निर्णय झालेला नाही. पाकच्या राजकीय तज्ज्ञांच्या मते पाकिस्तानचे लष्कर इमरान खान यांना पुन्हा सत्तेत आणू इच्छीत नाही. त्यामुळे इमरान यांना रोखण्यासाठी नवाझ आणि बिलावल यांच्यात युती होऊ शकते असे म्हटले जात आहे. अनेक पक्ष देखील या युतीत सामील होऊ शकतात असे म्हटले जात आहे. या युतीचे नेतृत्व नवाझ शरीफ किंवा त्यांचे बंधू शहबाज शरीफ देखील करु शकतात असे म्हटले जात आहे.
पाकिस्तान येणाऱ्या या मिलीजुली सरकारचे नेतृत्व पडद्यामागून पाकिस्तान लष्कराच्या हातात असणार आहे. पाकिस्तानी आर्मी थेट सरकार स्थापन करण्यात पुढे येणार नाही. कारण पाकिस्तानात पीटीआयचे सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या घडामोडींमुळे लष्कराविरोधात नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सत्तेत थेट सहभाग दाखवून पाकच्या लष्कराला नागरिकांचा संताप ओढावून घ्यायचा नाही. त्यामुळे सध्या पडद्यामागूनच किंगमेकर बनून कळसूत्री सरकार चालवायचे अशी पाकिस्तानी लष्कराची योजना आहे.
Pakistan Election Results 2024
Pakistan Election Results 2024
Pakistan Election Results 2024
Pakistan Election Results 2024
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements