प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस गेल्या 7 महिन्यांपासून अभिनेत्रीच्या शोधात आहेत. युपीतील रामपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने अभिनेत्रीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. पोलिसांनी अभिनेत्रीविरोधात वॉरंट जारी करण्याची ही सातवी वेळ आहे. राज्याव्यतिरिक्त अन्य भागातही पोलीस जयाप्रदा यांचा शोध घेत आहेत, मात्र अद्यापपर्यंत पोलिसांना यश आलेले नाही. गेल्या सात महिन्यांपासून जयाप्रदा फरारा असून पोलीस अभिनेत्रीचा शोध घेत आहेत.
अभिनेत्री जयाप्रदा यांच्याविरोधात रामपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयात दोन खटले सुरू आहेत. यातील एक गुन्हा केमरी येथे तर दुसरा गुन्हा स्वार पोलीस ठाण्यात सुरू आहे. दोन्ही प्रकरणे लोकसभा निवडणूक 2019 मधील आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित आहेत. 2019 मध्ये जयाप्रदा निवडणुकीसाठी उभ्या होत्या. आचारसंहिता लागू झाल्यानंतर जयाप्रदा यांनी नियम मोडल्यामुळे अभिनेत्रीवर कारवाई करण्यात आली होती. संबंधीत प्रकरणांतील खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. कारण जयाप्रदा न्यायालयात हजर राहत नाहीत. आता त्याच्याविरुद्ध सातव्यांदा अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. पुढे न्यायालय कोणती कारवाई करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याप्रकरणी पुढिल सुनावणी 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
रामपूरच्या कोर्टाने आता सक्त आदेश दिले आहेत. जयाप्रदा यांना कोर्टात हजर करा असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस अभिनेत्रीचा शोध घेत आहेत. पण अभिनेत्री फरार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जयाप्रदा यांची चर्चा रंगली आहे.
काय आहे प्रकरण? : जयाप्रदा यांनी भाजपच्या तिकिटावर रामपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. निवडणूकीत जयाप्रदा यांना अपयशाचा सामना करावा लागला होता. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतरही त्यांनी 19 एप्रिल रोजी नूरपूर गावात रस्त्याचं उद्घाटन केलं होतं. कार्यक्रमाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. जयाप्रदा यांच्या संबंधी दुसरी घटना केमरी पोलीस ठाण्यातील आहे. पिपलिया मिश्रा गावात आयोजित जाहीर सभेत जयाप्रदा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. रामपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयात दोन्ही प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. अशात जयाप्रदा कधी न्यायालयासमोर उभ्या राहतील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Non-bailable warrant against Jayaprada
Non-bailable warrant against Jayaprada
Non-bailable warrant against Jayaprada
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements