हमासच्या (Israel-Hamas War) दहशतवाद्यांप्रमाणे छत्तीसगडमधील दंतेवाड्यात नक्षलवाद्यांनी सुरुंग तयार केल्याचे समोर आले आहे. दंतेवाडा हा छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्हा आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 14 हजारांहून कमी आहे. आजूबाजूला घनदाट जंगले आहेत. जे नक्षलवाद्यांना आश्रय देतात. या जंगलातून नक्षलवादी बाहेर पडून आपल्या पोलीस आणि निमलष्करी दलांवर हल्ला करतात (Naxalites 130 metre long and 6 feet deep tunnel discovered in Chhattisgarh).
नक्षलवाद्यांनी दंतेवाड्यात हमासच्या दहशतवाद्यांप्रमाणे सुरुंग केले आहेत. असाच एक सुरुंग दंतेवाडा पोलिसांनी उघड केला आहे. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. पोलिसांनी सुरुंग उद्धवस्त केला आहे. व्हिडीओमध्ये सुरुंगाची खोली दिसत आहे. सुरुंग बरीच लांब आहे. मधल्या सुरुंगाध्ये मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. जेणेकरून नक्षलवादी त्यातून बाहेर पडून सुरक्षा दलांवर हल्ला करू शकतील. हे सुरुंग लपविण्यासाठी लाकडाचा वापर केला जातो.
#WATCH | Chhattisgarh: Visuals from a tunnel dug by Naxalites to be used as a bunker, in Dantewada.
(Source: Dantewada Police) pic.twitter.com/04gRKCtWYl
— ANI (@ANI) January 31, 2024
30 जानेवारी 2024 रोजी नक्षलवाद्यांनी सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या नवीन सुरक्षा छावणीवर हल्ला केला होता. यामध्ये 3 CRPF जवानांना शहीद झाले. त्यापैकी दोघे कोब्रा बटालियनचे होते. याशिवाय 14 जवान जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत हे बोगदे शोधणे ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. यापूर्वी 2021 मध्ये याच ठिकाणी चकमक झाली होती. त्यावेळी 23 जवान शहीद झाले होते. नवीन सुरक्षा शिबिर बांधल्यानंतर, कोब्रा कमांडो, विशेष टास्क फोर्स आणि जिल्हा राखीव गार्ड यांच्या पथकांनी नक्षलविरोधी अभियान सुरू केले.
असे सुरुंग नक्षलवाद्यांमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा बोगदा दंतेवाडा-विजापूर सीमेवर बांधण्यात आला होता. हवाई हल्ले टाळण्यासाठी हमासने इस्रायलमध्ये असे सुरुंग बांधले होते. यापूर्वी कधीही नक्षलवाद्यांमध्ये असे सुरुंग दिसले नसल्याची चर्चा सुरक्षा विभागात आहे.
Naxalites 130 metre long and 6 feet deep tunnel
Naxalites 130 metre long and 6 feet deep tunnel
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements