इंडिगो आणि मुंबई विमानतळाला मंत्रालयाची नोटीस
मुंबई विमानतळावर काही प्रवासी रनवेवर बसूनच जेवण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची गंभीर दखल नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतली आहे. यासंदर्भात मंत्रालयाने इंडिगो आणि मुंबई एअरपोर्टला नोटीस बजावली आहे. दोन्ही पक्षांना यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत (IndiGo, Mumbai airport get showcause notice after passengers seen eating on tarmac).
निर्धारित वेळेमध्ये माहिती दिली गेली नाही. तर कडक कारवाई करण्यात येईल. यात आर्थिक दंडाचा देखील समावेश असेल, असा सक्त इशारा मंत्रालयाने घेतला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज सकाळी यासंदर्भात बैठक घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून नोटीस बजावण्यात आली आहे. प्रवाशांची योग्य काळजी न घेतल्याप्रकरणी मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
passengers of IndiGo Goa-Delhi who after 12 hours delayed flight got diverted to Mumbai having dinner just next to indigo plane pic.twitter.com/jGL3N82LNS
— JΛYΣƧΉ (@baldwhiner) January 15, 2024
मंत्रालयाने मुंबई विमानतळ प्रशासन आणि इंडिगो कंपनी या दोघांना या घटनेसाठी जबाबदार धरलंय. परिस्थितीबाबत योग्य अंदाज न बांधणं आणि प्रवाशांना योग्य सुविधा न पुरवणं या गोष्टींसाठी दोघेही कारणीभूत असल्याचं मंत्रालयाकडून म्हणण्यात आलंय. मुंबई विमानतळाने प्रवाशांना रेस्टरुम आणि रिफ्रेशमेंट सुविधेचा लाभ घेऊ दिला नाही. त्यांना रणवेवरच थांबावं लागलं. यावेळी सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले असं मंत्रालयाने म्हटलंय. यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात प्रवासी रनवेवर बसले होते आणि याच ठिकाणी ते जेवण करत होते. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावरुन याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
इंडिगोने व्हायरल व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. फ्लाईट 6E2195 गोवा ते दिल्ली जाणार तीते. दिल्लीतील धुक्यांमुळे फ्लाईट मुंबईकडे वळवण्यात आली. त्याबद्दल आम्ही आमच्या प्रवाशांची माफी मागतो. या प्रकरणात आम्ही लक्ष घालत आहोत, असं कंपनीकडून जाहीर करण्यात आलं होतं.
IndiGo, Mumbai Airport Get Notice After Passengers Seen Eating On Tarmac
IndiGo, Mumbai airport operator get show cause notices after video showing passengers eating on tarmac goes viral
Mumbai airport passengers eating on tarmac
Mumbai airport passengers eating on tarmac
Mumbai airport passengers eating on tarmac
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements