Bengaluru man bites policeman after being caught riding without helmet
कर्नाटक Viral Video : प्रवासादरम्यान हेल्मेट न घालणे, गाडी वेगात चालवणे, ट्रॅफिक नियम तोडणे आदी अनेक कारणांसाठी वाहतूक पोलीस अनेक दुचाकीस्वारांना दंड भरण्यास सांगतात. पण, स्वतःची चूक स्वीकारणं सोडा… अनेक दुचाकीस्वार वाहतूक पोलिसांशी वाद घालतात. कर्नाटकाची राजधानी बंगळुरूमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. एका तरुणाला विनाहेल्मेट प्रवास करताना पकडल्यानंतर त्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे बोट चावलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सय्यद रफी हा प्रवासी हेल्मेट न घालता प्रवास करत असतो. तर वाहतूक पोलीस कर्मचारी विल्सन गार्डन 10th क्राॅस येथे त्याला थांबवतात आणि त्याच्या दुचाकीची चावी जप्त करतात. पोलिसांनी अडवले म्हणून प्रवासी दुचाकीवरून उतरतो आणि गैरवर्तन करतो. त्यामुळे हे भांडण टोकाला जाताना दिसते. बघता बघता प्रवासी रागात ट्रॅफिक पोलिसांचा हात पकडतो आणि त्यांचे बोट चावतो. एकदा तुम्हीसुद्धा पाहा हा व्हायरल व्हिडीओ.
#Bengaluru: A scooterist, who was caught riding without #helmet, BITES a #traffic #police constable near Wilson Garden 10th Cross.
Gets #ARRESTED. @NammaBengaluroo @WFRising @0RRCA @ECityRising @TOIBengaluru @NammaKarnataka_ @peakbengaluru @namma_BTM pic.twitter.com/Wsatq9d5XM
— Rakesh Prakash (@rakeshprakash1) February 13, 2024
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, जेव्हा दुचाकीस्वार वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे बोट चावतो तेव्हा तिथे उपस्थित हेड कॉन्स्टेबल सिद्धरामेशवर संपूर्ण घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेत असतात. तेव्हा मोबाईलच्या समोर हा तरुण उभा राहतो आणि सांगतो मी रुग्णालयात जात होतो आणि घाईगडबडीत हेल्मेट घालायला विसरलो. हे बोलताच तरुण हेड कॉन्स्टेबलचा फोन खेचून घेतो. तसेच यादरम्यान तरुणाने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्याला वेळीच पकडलं.
सोशल मीडियावर ही पोस्ट एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये या घटनेचा व्हिडीओ, तक्रार केल्याचा फोटो आणि तरुणाचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. तसेच वाहतूक पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ करणे, शारीरिक दुखापत करणे, धमकी देणे आणि शांतता भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ; असे पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच सोशल मीडियावर या घटनेने अनेकांच लक्ष वेधून घेतलं आहे.
Man caught without helmet bites traffic police
Man caught without helmet bites traffic police
Man caught without helmet bites traffic police
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements