सावरकरांच्या पुस्तकाने मोठी खळबळ
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्या नव्या पुस्तकामुळे एकच खळबळ उडाली आहे. रणजित सावरकर यांच्या एका पुस्तकाचं नुकतंच नवी दिल्लीत प्रकाशन झालं आहे (Book : Make Sure Gandhi Is Dead). या पुस्तकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महात्मा गांधी यांची उद्या 30 जानेवारीला पुण्यातिथी आहे. त्याआधी रणजित सावरकर यांच्या प्रकाशित झालेल्या नव्या पुस्तकाने खळबळ उडाली आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे.
Make Sure Gandhi Is Dead
या पुस्तकारत सावरकरांनी महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत मोठा दावा केला आहे. महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केली नाही, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रणजित सावरकर यांनी महात्मा गांधीजींच्या पोस्टमार्टमवरही आक्षेप नोंदवला आहे. रणजित सावरकर लिखित असलेलं ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचं नवी दिल्लीत प्रकाशन झालं आहे. पण प्रकाशानंतर लगेच त्यांचं नवं पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या पुस्तकात महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत वेगळा दावा करण्यात आला आहे.
नथुराम गोडसे याने झाडलेल्या गोळ्या आणि महात्मा गांधीजींच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या वेगवेगळ्या होत्या, असा दावा Make Sure Gandhi Is Dead या पुस्तकात करण्यात आला आहे. रणजित सावरकर यांचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या पुस्तकावर प्रतिक्रिया दिली आहे. कायदेशीर बाबींचा विचार करूनच आम्ही पुस्तक प्रकाशित करतोय, असं ते म्हणाले आहेत. रणजित सावरकर यांनी महात्मा गांधीजींच्या हत्येबाबत केलेल्या दाव्यावरुन त्याचं पुस्तक आता वादाच्या भोवऱ्यात पडण्याची शक्यता आहे.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements