काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये आपला मुलगा 22 वर्षानंतर परत आला म्हणून आईच्या आंनदाला पारावर राहिला नव्हता. तिच्या डोळ्यात आंनदाश्रू आले होते. पण, 15 दिवस होत नाहीत तोच तिला एका कटू सत्याला सामोरे जावे लागले. साधू बनून परत आलेला व्यक्ती आपला मुलगा नसल्याचं तिला समजलं आहे. शिवाय याप्रकरणात त्या भामट्याकडून फसवणूक देखील करण्यात आली आहे.
दिल्लीची रहिवाशी असलेल्या भानमती सिंग यांना आपला मुलगा पिंकू 22 वर्षांनी परत आला म्हणून आनंद झाला होता. आई त्याला सतत खेळत असल्याने रागवायची. त्यामुळे 11 वर्षांचा पिंकू घरातून पळून गेला होता. दिल्लीच्या घरुन पिंकू 2002 मध्ये पळाला होता. आईच्या मनात हे दु:ख घर करुन राहिलं होतं. पण, जेव्हा मुलगा साधू बनून तिच्यासमोर आला तेव्हा तिला आयुष्यातला सर्वोच्च आनंद झाला होता (Lost son comes home after 22 years as monk; turns out to be a fraudster).
भामट्याने दावा केला होता की, त्याने संन्यास घेतला आहे. त्यामुळे त्याला झारखंडमधील परसनाथ मठ येथे परत जायचं आहे. सुरुवातीला भानमती आणि रतीपाल यांनी त्याला परत जाऊ देण्यास नकार दिला, पण त्याचा निर्धार पाहून त्याला जाऊ दिले. जात असताना त्याला कुटुंबियांकडून 11000 रुपये, एक फोन आणि गावकऱ्यांकडून 13 क्लिंटल धान्य देण्यात आले. त्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी तो मठाकडे जाण्यास निघाला.
पिंकूने घर सोडल्यानंतर वडील रतीपाल यांना फोन आला. मठाचे लोक मला सोडण्यास तयार आहेत. पण, त्यांनी ₹ 10 लाखांची मागणी केली आहे, असं पिंकूने वडिलांना सांगितले. मुलगा परत मिळावा यासाठी काहीही करण्यास तयार असणाऱ्या रतीपाल आणि भानमती यांनी आपली जमीन विकली आणि त्यातून 11.2 लाख उभे केले. पिंकूला फोन करुन पैशाची व्यवस्था झाल्याचे सांगितले. तसेच पैसे देण्यासाठी मठाकडे येतो असं रतीपाल यांनी पिंकूला सांगितलं.
पिंकूने रतीपाल यांना मठाकडे न येण्याचा आग्रह धरला. त्यासाठी त्याने अनेक कारणे दिली. त्यातील अनेक विश्वास ठेवण्यासारखी नव्हती. पिंकू रतीपालला पैशे बँकेमध्ये ट्रान्सफर करण्याचा आग्रह धरत होता. काहीसा संशय आल्याने त्यांनी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना आढळलं की, झारखंडमध्ये परसनाथ नावाचा कोणताही मठ नाही. हे एकून भानमती आणि रतीपाल यांना धक्काच बसला. रतीपाल यांनी त्यानंतर अमेठी जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केल्यानंतर आढलून आलं की, जो स्वत:ला पिंकू म्हणवून घेत होता तो नफिस आहे. तो गोंडा गावात राहतो. त्याने फसवणुकीच्या हेतूने हा सर्व बनाव रचला होता.नफिसचा भाऊ रशिदने देखील अशाच प्रकारे एका कुटुंबाला फसवले होते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Lost son comes home after 22 years
Lost son comes home after 22 years
Lost son comes home after 22 years
Lost son comes home after 22 years
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements