मेंढपाळ आणि चिनी सैनिकांमध्ये चांगलीच झटापट
पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेजवळ चीनने पुन्हा एकदा दादागिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना रोखण्याचा प्रयत्न केला. (Ladakh shepherds confront Chinese soldiers who tried to stop sheep grazing) यावर निशस्त्र भारतीय मेंढपाळांनी धाडस दाखवत सशस्त्र चिनी सैनिकांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं. भारतीय मेंढपाळ आणि चिनी सैनिकांमध्ये चांगलीच झटापट देखील झाली. या थरारक प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओ पाहून अनेकांनी चिनी सैन्यावर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, भारतीय मेंढपाळांनी आमच्या वाहनांवर दगडफेक केली असा दावा काही चिनी सैनिकांनी केला आहे. चीनकडून अशी प्रक्षोभक कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही चीनकडून लडाख भागात अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) चिनी सैनिकांनी भारतीय (Indian) मेंढपाळांना जनावरे चारण्यापासून रोखले.
Brave Nomad of Ladakh Changpa (Northerner) Tribe Confront with PLA at Changthang, eastern Ladakh near Dumchele. Changpa fighting with its handmade rope wipe (Stone thrower) #India #China #Ladakh pic.twitter.com/uzHjlA61Z3
— sorig ladakhspa (ソナム・リグゼン・ラダクパ) (@sorigzinam) January 30, 2024
यानंतर चिनी सैनिक आणि भारतीय मेंढपाळांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले. यावेळी भारतीय मेंढपाळांनी चिनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिलं. चिनी सैनिक सशस्त्र होते. तर भारताचे स्थानिक मेंढपाळ निशस्त्र होते. मात्र, असे असूनही ते चिनच्या सैनिकांना उत्तर देण्यापासून मागे हटले नाहीत.
चुशुल समुपदेशक कोंचोक स्टॅनजिन यांनी दोन्ही पक्षांमधील संघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये चिनी सैनिक मेंढपाळांना थांबवताना दिसत आहेत आणि मेंढपाळ त्यांच्याशी वाद घालत आहेत. त्या ठिकाणाहून परतण्यास नकार देत आहेत. माहितीनुसार, चिनी सैनिक आणि पूर्व लडाखमधील स्थानिक मेंढपाळांमध्ये झालेल्या झटापटीचा हा व्हिडीओ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील आहे. व्हिडीओमध्ये चिनी सैनिक भारतीय मेंढपाळांसोबत वाद घातलाना दिसून येत आहे.तसेच ते गुराख्यांना परत जाण्यास सांगत आहेत.
Ladakh shepherds confront Chinese soldiers who tried to stop sheep grazing
Ladakh shepherds confront Chinese soldiers
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements