Kupendra Reddy’s entry stirs Karnataka Rajya Sabha pot
Rajya Sabha Election
बेळगाव—belgavkar @कर्नाटक : राज्यसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असून, आपल्या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याच्यादृष्टीने सावधगिरी बाळगली आहे. पक्षाच्या सर्व आमदारांना रिसॉर्टमध्ये नेऊन ठेवण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. राज्यसभेची निवडणूक 27 फेब्रुवारीला होणार आहे. क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी काँग्रेसने आदल्या दिवशी एका खासगी रिसॉर्टमध्ये आमदारांची बैठक आयोजित केली आहे. तेथेच व्हीप जारी करण्याची शक्यता आहे.
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला 45 मतांची गरज आहे. या हिशोबानुसार काँग्रेसला (135 आमदार) 3 जागा मिळणार हे निश्चित आहे. भाजपकडे 65 आमदार असून 45 मतांच्या आधारे एक राज्यसभा निवडून येणे शक्य आहे. उर्वरित 20 मते आणि निजदची 19, कल्याण राज्य प्रगती पक्षाचे 1, अपक्ष 2, सर्वोदय कर्नाटक पक्षाचे 1 मत तसेच काँग्रेसमधील नाराजांची मते मिळवून पाचव्या उमेदवाराच्या विजयाचा विश्वास युतीला आहे.
धजदने Real estate baron कुपेंद्र रेड्डी यांना पाचवे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवल्याने राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. क्रॉस व्होटिंग होण्याची काँग्रेसला भीती आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुध्द क्रॉस व्होटिंग झाल्यास व पराभूत झाल्यास त्याचा सत्ताधारी काँग्रेसवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी रिसॉर्टमध्ये बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशन संपताच सर्व आमदार रिसॉर्टवर जाणार आहेत. राज्यसभेसाठी उमेदवार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अजय माकन यांनी विधानसभेच्या लॉबीत येऊन आपल्या पक्षाच्या आमदारांची भेट घेऊन मतयाचना केली. काँग्रेसचे नासिर हुसेन आणि जी. सी. चंद्रशेखरही मतांची याचना करीत आहेत.
भाजपने 1 उमेदवार उभा केला आहे. 4 उमेदवार असते तर निवडणूक बिनविरोध झाली असती, मात्र 5 उमेदवार असल्याने निवडणुकीला रंगत आली आहे. काँग्रेस, धजद आणि भाजप या तिन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. धजद-भाजप युतीने आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी रणनीती आखली आहे आणि आपल्या आमदारांची मते वाया जाणार नाहीत, याची काळजी घेतली आहे. दरम्यान, निधी वाटपावरून काही आमदार नाराज असून निवडणुकीच्यावेळी कोणत्याही कारणास्तव आमदार फुटले जाऊ नये, यासाठी काही ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस आमदारांची मते कोणत्याही कारणाने फुटू नयेत. त्याची खबरदारी घेण्याचा, आदेश दिला आहे.
अपक्ष आमदार काय करणार? : शिक्षक मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यानंतर हायकमांडने आता राज्यसभेतही तीनही उमेदवारांच्या विजयासाठी खबरदारी घेण्याचे सुचवले आहे. 27 फेब्रुवारीला मतदान होणार असून अपक्ष आमदार कोणाच्या बाजूने झुकणार आहेत? कोणत्या पक्षाचे सदस्य क्रॉस व्होटिंग करणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Kupendra Reddy Karnataka Rajya Sabha Election
Belgaum Real estate baron Kupendra Reddy Karnataka Rajya Sabha Election belgav belagavi belgavkar explore digital india
Kupendra Reddy Karnataka Rajya Sabha Election
Kupendra Reddy Karnataka Rajya Sabha Election
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements