देशाची विभागणी करण्याची भाषा करत आहेत. अशा…
कर्नाटक : भाजपाचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. काँग्रेसचे खासदार डीके सुरेश आणि आमदार विनय कुलकर्णी यांना ठार करण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी ईश्वरप्पा यांनी केला आहे. काँग्रेसचे हे दोन्ही नेते राष्ट्रद्रोही असून ते भारताची विभागणी करण्याची भाषा वापरत आहेत, अशी टीका ईश्वरप्पा यांनी केली (BJP Leader Seeks Law to Kill Congress Leaders Who Are “Traitors To India”).
ईश्वरप्पा पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांनी पुन्हा असे विभाजनवादी विधान करण्याचा प्रयत्न केला तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छितो की, डीके सुरेश आणि विनय कुलकर्णी हे देशाचे गद्दार आहेत. त्यांना राष्ट्राचे तुकडे करायचे असल्याचे त्यांच्या विधानांवरून दिसते. त्यामुळे त्यांना गोळ्या घालून ठार मारता येईल, असा कायदा करण्याची माझी सूचना आहे. दावणगेरे जिल्ह्यात पदाधिकारी आणि भाजपाचे नवे अध्यक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या शपथविधी समारंभावेळी ईश्वरप्पा यांनी विधान केले. 75 वर्षीय नेते ईश्वरप्पा यांच्या वादग्रस्त विधानामुळे वाद निर्माण झाला असून अनेकांनी यावर टीका केली आहे.
ईश्वरप्पा यांच्या या विधानानंतर सामाजिक कार्यकर्त्या कविता रेड्डी यांनी एक्स अकाऊंटवर टीका केली आहे. “के. एस. ईश्वरप्पा यांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून ठार मारण्यात यावे, असे जर मी म्हटले असते तर बंगळुरू पोलिसांनी मला अटक केली असती. परंतु डीके सुरेशच्या हत्येबद्दलचे विधान केल्याबद्दल ईश्वरप्पा यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. कायदा हा सत्तेनुसार राबविला जातो.”
केंद्र सरकराने निधीचे अयोग्य वाटप केल्याबद्दल कर्नाटक सरकारने केंद्राच्या विरोधात आंदोलन केले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी ईश्वरप्पा यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. काँग्रेस करदात्याचे पैसे खर्च करून स्वतःचा प्रचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
KS Eshwarappa Seeks Law to Kill Congress Leaders
KS Eshwarappa Seeks Law to Kill Congress Leaders
KS Eshwarappa Seeks Law to Kill Congress Leaders
KS Eshwarappa Seeks Law to Kill Congress Leaders
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements