महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक
बेळगाव / कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास मंगळवारी येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पकडले. सुमित महादेव निकम (गजबरवाडी, ता. निपाणी, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 8 ठिकाणी घरफोडी केल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कर्नाटकातील अभिलेखावरील गुन्हेगार सुमित निकम हा चोरीच्या सोन्याचे दागिने घेऊन मार्केट यार्ड येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. या ठिकाणी तो आला असता पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 107 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 500 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने ताब्यात घेतले (₹ 6.78 लाख). हे दागिने मुरगुड, राधानगरी, शहापूर या पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन तर आजरा व कुरुंदवाड येथील एका चोरीचे असल्याची कबुली त्याने दिली.
त्याच्यावर महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात जबरी चोरी, घरफोडीचे 20 गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर, शेष मोरे, तुकाराम राजगिरे, सुरेश पाटील, सागर माने यांच्या पथकाने केली.
kolhapur 8 cases house burglary thief arrested
kolhapur 8 cases house burglary thief arrested
kolhapur 8 cases house burglary thief arrested
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements