कर्नाटक : रामायण, महाभारताला काल्पनिक म्हटल्याने मंगळुरुतील एका शिक्षिकेला शाळेतून काढून टाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. शिक्षिकेने रामायण, महाभारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह टीका केल्याने उजव्या विसारसरणीचा गट आक्रमक झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (Karnataka : School teacher suspended over derogatory remarks on Lord Ram. Teacher Sacked After She Tells Students “Mahabharat, Ramayan Imaginary”)
भाजप आमदार वेदास कामथ यांच्या समर्थक गटाने या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली होती. याप्रकरणी असा आरोप करण्यात आलाय की, सेंट जॉर्ज इंग्लिश एचआर प्रायमरी स्कूलच्या शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यांना महाभारत आणि रामायण हे घडलेलं नाही. केवळ त्या काल्पनिक कथा आहेत असं सांगितलं. तसेच शिक्षिकेने पंतप्रधान मोदी यांच्याबाबतही आक्षेपार्ह बोलल्याचा आरोप आहे.
शिक्षिकेने 2002 मधील गोध्रा दंगल आणि बिल्किस बानो सामूहिक बलात्काराचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये द्वेषाची भावना पेरण्याचा प्रयत्न केला असा आरोप उजव्या गटाने आपल्या तक्रारीमध्ये केला आहे. शनिवारी भाजप आमदाराच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. शिक्षिकेच्या निलंबनाची मागणी यावेळी करण्यात आली होती. भाजप आमदार यावेळी म्हणाले की, तुम्ही पूजा करणारा येशू शांततेवर विश्वास ठेवतो. पण, शाळेतील सिस्टर हिंदू मुलांना टिकली न लावण्याचा, बांगड्या न घालण्यास सांगतात. रामावर दूध टाकणे विनाकारण आहे असं सांगतात. कोणी तुमच्या श्रद्धांचा अपमान केल्यास काय करणार? तुम्ही शांत बसणार नाही. पालकांनी दावा केलाय की शिक्षिकेने सातवीच्या मुलांना प्रभू राम एक काल्पनिक पात्र असल्याचं सांगितलं.
शाळा प्रशासनाकडून कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी शिक्षिकेची हकालपट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणी DDPI तपास करत आहेत. शाळा प्रशासनाने निवेदनात म्हटलंय की, सेंट जॉर्ज स्कूलला 60 वर्षांचा इतिहास आहे. आतापर्यंत अशी घटना घडली नाही. दुर्दैवी घटनेमुळे आमच्यात आणि तुमच्यात अविश्वास निर्माण झालाय. तो विश्वास पुन्हा प्राप्त करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आम्ही काम करत राहू. दरम्यान, याप्रकरणी अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.
Karnataka teacher suspended remarks on Lord Ram
Karnataka teacher suspended remarks on Lord Ram
Karnataka teacher suspended remarks on Lord Ram
Karnataka teacher suspended remarks on Lord Ram
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements