आता ओला, उबरसह सर्वांचे एकच रेट
Karnataka fixes uniform fare for taxis including Uber, Ola
कर्नाटक—belgavkar : कर्नाटक सरकारने ओला आणि उबेर सारख्या ऑनलाइन टॅक्सी सेवांसाठी तसेच राज्यातील इतर टॅक्सी सेवांसाठी फिक्स भाडे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे (Karnataka govt fixes fares for Ola, Uber and other taxis). शहरातील वेगवेगळ्या टॅक्सी सेवांमध्ये जास्त पैसे आकारण्याच्या समस्या सोडवण्यासाठी एकसमान भाडे आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य परिवहन विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वाहनांच्या किमतीनुसार भाडे विभागण्यात आले आहे. दरांमध्ये किमान भाडे आणि प्रति किलोमीटर अतिरिक्त शुल्क देण्यात आले आहे.,
वाहनांच्या किमतीनुसार भाडे 3 श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे. 10 लाखांपर्यंतच्या वाहनांचे किमान भाडे 4 किमीसाठी 100 रुपये ठेवण्यात आले आहे, त्यानंतर प्रत्येक जास्तीच्या किलोमीटरसाठी 24 रुपये आकारले जातील. त्याचप्रमाणे, 10 ते 15 लाख रुपये किंमतीच्या वाहनांसाठी, 4 किमीसाठी किमान भाडे 115 रुपये ठेवण्यात आले आहे आणि त्यापुढील अतिरिक्त किलोमीटरसाठी 28 रुपये भाडे आकारले जाईल. 15 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांसाठी, 4 किमीसाठी किमान 130 रुपये भाडे आकारले जाईल, त्यानंतर पुढील अतिरिक्त किलोमीटरसाठी 32 रुपये भाडे आकारले जाईल.
या अधिसूचनेत याप्रमाणेच, सामान तसेच वेटिंग रेट आणि रात्रीच्या प्रवासासाठी आकारली जाणारी जास्तीचे शुल्क याविषयी देखील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. आता प्रवाशांना 120 किलोपर्यंत सामान मोफत नेता येणार आहे, त्यानंतर अतिरिक्त 30 ग्रॅम सामानासाठी 7 रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच पहिल्या 5 मिनिटांसाठी वेटिंग चार्ज नसेल, त्यानंतर प्रति मिनिटासाठी 1 रुपये शुल्क आकारले जाईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान चालणाऱ्या टॅक्सींना 10 टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. तसेच अधिसूचनेत पुढे म्हटले आहे की प्रवाशांकडून जीएसटी टोल शुल्क वसूल केले जाऊ शकते, परंतु वेळेच्या आधारावर कोणतीही वसुली केली जाऊ शकत नाही.
Karnataka fixes fares Ola Uber taxis belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india
Karnataka fixes fares Ola Uber taxis
Karnataka fixes fares Ola Uber taxis
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements