Karnataka Congress protests against Centre in Delhi
केंद्राच्या कर संकलनातून मिळणाऱ्या अल्प परताव्यावर कर्नाटक सरकारमध्ये असलेली नाराजी व्यक्त करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज दिल्लीत जंतरमंतरवर जोरदार निदर्शने केली. करामध्ये कर्नाटकचे योगदान 4.30 लाख कोटी रुपयांचे असून कर्नाटकला निधीमध्ये न्याय्य वाटा मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना केंद्र सरकारव दबाव वाढविण्यासाठी जंतरमंतरवरील निदर्शनांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रीमंडळ सहभागी झाले होते.
कर्नाटककडून घेतल्या जाणाऱ्या दर 100 रुपयांपैकी केवळ 12 रुपये परत मिळत आहेत, अशी टिका सिद्धरामय्या यांनी केली. ते म्हणाले, की केंद्राकडून होणाऱ्या करसंकलनामध्ये महाराष्ट्र प्रथम तर कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे, कर्नाटकमधून यावर्षी 4.30 लाख कोटी रुपये कर मिळाल्याचा दावाही सिद्धरामय्या यांनी केला. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले, की कर्नाटक हे देशाला सर्वाधिक महसूल देणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. हा विरोध कर्नाटकच्या लोकांच्या हक्कासाठी आहे. गुजरातला ज्याप्रमाणे केंद्र सरकारने योजना दिल्या आहेत, तशाच योजना कर्नाटकलाही मिळाव्यात अशीही मागणी उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी केली.
दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटकमधील कॉंग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी दावा केला, की दुष्काळी स्थितीत मदतीचा 18 हजार कोटी रुपयांचा निधी कर्नाटकला मिळालेला नाही, मनरेगातील कामकाजाच्या दिवसांची संख्या 100 वरून 150 दिवसांवर आणावी, अशी मागणीही केंद्राने अद्याप मान्य केली नसल्याची नाराजी प्रियांक खर्गे यांनी व्यक्त केली. कॉंग्रेस नेते सलीम अहमद यांनीही कर्नाटकचा केंद्राकडे मागील 4 वर्षांपासून निधी थकला असल्याचा दावा केला. तर, कर्नाटकचे मंत्री रामलिंग रेड्डी यांनी कर्नाटकमध्ये 236 पैकी 220 तालुक्यांमध्ये दुष्काळ असल्याकडे लक्ष वेधले.
Karnataka Congress protests against Centre in Delhi
Karnataka Congress protests against Centre in Delhi
Karnataka Congress protests against Centre in Delhi
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310