मंत्रिपद दिलं होतं. त्यानंतर ते निवडणुकीच्या मैदानात
Karanpur Election Result : राज्यस्थानमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपुर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव जवळपास निश्चित मानला जातोय. करणपुर पोटनिवडणुकीची आज मतमोजणी सुरु आहे. यामध्ये भाजपचे सुरेंद्र पाल सिंह टीटी 12 व्या फेरीनंतर सात हजारांपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहेत. राजस्थान सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपनं सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना मंत्रिपद दिलं होतं. त्यानंतर ते निवडणुकीच्या मैदानात उतरले. पण आता त्यांच्यावर पराभवाचं सावट ओढावलं आहे.
दरम्यान, राजस्थान निवडणुकीत प्रचारावेळी काँग्रेस उमेदवार अन् तत्कालीन आमदार गुरमीत सिंह कूनर यांचं निधन झालं होतं. त्यामुळे निवडणूक आयोगानं करणपुर विधानसभा निवडणूक स्थगित केली होती. त्यानंतर तिथे निवडणूक पार पडली. भाजपनं सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना रिंगणात उतरवलं होतं, तर काँग्रेसकडून कूनर यांचा मुलगा रूपिंदर सिंह याला तिकिट दिलं होतं.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, करणपुर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या 12 फेऱ्या पार पडल्या आहेत. काँग्रेस उमेदवार रुपिंदर सिंह कूनर यांची आघाडी कायम आहे. त्यांनी आतापर्यंत 84 हजार मतं मिळालं आहेत. तर भाजप उमेदवार मंत्री सुरेंद्र पाल सिंह यांना 75 हजार इतकी मतं मिळाली आहेत. ते 9 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
करणपुर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपनं सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना रिंगणात उतरवलं. पण त्याआधीच त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. आमदार होण्याआधीच सुरेंद्र सिंह टीटी हे मंत्री झाले होते. त्यांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. यावरुन काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला होता. सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना भाजपचे वरिष्ठ आणि अनुभवी नेता मानले जाते. 1994 मध्ये ते मंत्रिमंडळात होते. राजस्थान वेयरहाउसिंगचं अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलेय. वसुंधराजे सरकारमध्ये (2003-2008) त्यांनी कृषिमंत्री म्हणून काम पाहिलेय. त्यानंतर 2013-2018 यादरम्यान ते पेट्रोलियम मंत्री होते. आता भजनलाल सरकारमध्ये त्यांना आमदार होण्याआधीच मंत्रिपद देण्यात आले होते. त्यांनी राज्यमंत्रि म्हणून शपथ घेतली होती.
Karanpur Election Result
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements