Jailed Putin opponent Alexei Navalny has died
रशियातील सर्वात प्रभावी विरोधक, अलेक्सी नवाल्नी यांचा मृत्यू झाल्याचे तेथील तुरुंगाधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यानंतर जगभरातून यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जर हा खून असेल, तर राजकीय विरोधकांना नामशेष करण्याच्या पुतिन यांनी सुरू केलेल्या सूडसत्रातील ही आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची हत्या मानायला हरकत नाही (Russia announces death of opposition leader Alexey Navalny in prison). रशियामध्ये यंदा निवडणूक असली, तरी तिचा निकाल आतापासूनच सर्वांना ठाऊक आहे. अशा स्थितीत नवाल्नी यांचा मृत्यू झाल्यामुळे जगभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
अलेक्सी नवाल्नी कोण होते? : पेशाने वकील असलेले नवाल्नी सत्ताधाऱ्यांमध्ये फोफावलेल्या भ्रष्टाचाराबद्दल सातत्याने आवाज उठवत राहिले. २००० च्या दशकात राष्ट्रवादी मोर्चामध्ये त्यांनी भाग घेतला. स्थलांतरावर निर्बंध आणावेत, यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यांच्या या राष्ट्रवादी विचारसरणीमुळे उदारमतवादी याब्लोको या विरोधी पक्षातून त्यांची हकालपट्टी झाली. त्यानंतरही ते पुतिन यांच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेला भ्रष्टाचार, त्यांची विलासी जीवनशैली यावर आवाज उठवत राहिले. आपल्या ब्लॉग्जमधून त्यांनी पुतिनधार्जिण्या उच्चभ्रूंवर टीकेची झोड उठविली.
२०११ साली झालेल्या निवडणुकीत फसवणुकीने पुतिन विजयी झाल्याचा आरोप करून रशियाभर निदर्शने झाली. त्यावेळी सुरुवातीलाच अटक करण्यात आलेल्यांपैकी नवाल्नी एक होते. पुतिन यांच्या एककल्ली कारभारामुळे रशियामध्ये पुन्हा क्रांती होईल, असे भाकीत वर्तवणारे नवाल्नी पुतिन यांच्या घशातला काटा बनले नसते, तरच नवल. सायबेरिया येथे कथितरित्या विषप्रयोग झाल्यानंतर त्यांच्यावर जर्मनीमध्ये उपचार केले गेले. २०२१ साली ते विपरीत परिस्थितीत मायदेशी परतले आणि पुतिनविरोधकांच्या गळ्यातील ताईत बनले. तेव्हापासून ते या ना त्या प्रकारे तुरुंगास भोगत होते. वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्यांचा संशयास्पदरित्या झालेला मृत्यू रशियातील परिस्थितीचा निदर्शक आहे.
‘आर्क्टिक सर्कल तुरुंगा’मध्ये चक्कर येऊन पडल्यामुळे नवाल्नी यांचा मृत्यू झाला, असे शुक्रवारी रशियाच्या तुरुंगाधिकाऱ्यांनी जाहीर केले आणि त्यावर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या. पाश्चिमात्य राष्ट्रांनी ही राजकीय हत्याच असल्याचा आरोप स्वाभाविकपणे केला. रशियात नेमके काय घडले, हे माहिती नाही. परंतु नवाल्नी यांच्या मृत्यूला पुतिन हेच जबाबदार आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले.
फ्रान्सचे अध्यक्ष इमान्युएल माक्राँ म्हणाले, की आजच्या रशियात मुक्तपणे वागणाऱ्यांना तुरुंगात डांबले जाते व नंतर मृत्युदंड दिला जातो. ‘हत्या’ या एकाच शब्दात प्रतिक्रिया दिली ती नोबेल विजेते रशियन संपादक दिमित्री मुराटोव्ह यांनी.
पुतिन यांनीच नवाल्नी यांना ठार केले, असा थेट आरोप युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला.
जर्मनीचे चँसेलर ओलाफ श्लोत्झ, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सेला व्हॉन देर लेवेन, ‘नेटो’चे महासचिव जेन्स स्टोलेनबर्ग यांनीही कमी-अधिक प्रमाणात पुतिन यांनाच या मृत्यूसाठी जबाबदार मानले आहे.
अर्थातच, रशियाने हे आरोप फेटाळले आहेत. नवाल्नी यांच्या मृत्यूबद्दल पुतिन यांना माहिती देण्यात आल्याचे ‘क्रेमलिन’ने जाहीर केले. मुळातच नवाल्नी यांना ‘अतिरेकी’ ठरवून तुरुंगात टाकण्यात आले होते. ते अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयएच्या हातचे बाहुले आहेत, असा प्रचार पुतिनधार्जिण्यांनी केला होता. त्यांचे अनेक सहकारी युरोपात आश्रय घेऊन राहिल्याचेही सातत्याने अधोरेखित केले जात होते. त्यांना रशियात अनेकवेळा अटक झाली होती. राजकीय खटल्यांबरोबरच भ्रष्टाचार, घोटाळे, फसवणूक असे आरोपही त्यांच्यावर केले गेले. गेल्याच वर्षी एका फौजदारी खटल्यात त्यांना १९ वर्षांची अतिरिक्त शिक्षा देण्यात आली होती. मात्र तुरुंगात राहूनही ‘बातम्यां’मध्ये असलेले नवाल्नी पुतिन यांना धोकादायक वाटत नसतील, तरच नवल. त्यांचा मृत्यू अपघात की घातपात याची चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप होतच राहतील. मात्र रशियामध्ये अशा प्रकारे ‘अपघाती’ मृत्यू झालेले ते पहिलेच पुतिनविरोधक नाहीत, हेदेखील खरेच.
Jailed Putin opponent Alexei Navalny has died
Jailed Putin opponent Alexei Navalny has died
Jailed Putin opponent Alexei Navalny has died
Jailed Putin opponent Alexei Navalny has died
Jailed Putin opponent Alexei Navalny has died
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements