ISRO’s high-resolution imaging satellite Cartosat-2 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थने (Indian Research Organisation (ISRO)) शक्तिशाली अशा कार्टोसॅट-2 या उपग्रहाला हिंदी महासागरात जलसमाधी दिली आहे. कार्टोसॅट-2 या उपग्रहाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. 14 फेब्रुवारी 2024 रोजी या सॅटेलाइटने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. त्यानंतर हिंदी महासागरात कोसळून नष्ट झाला. याच सॅटेलाइटची पुढची पिढी असलेल्या कार्टोसॅट-2 सी ने या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती (Cartosat-2 satellite re-enters Earth, burns over Indian Ocean – ISRO).
कुठल्याही प्रकारचा धोका उत्पन्न होऊ नये म्हणून या सॅटेलाईटला नियंत्रित पद्धतीने पृथ्वीच्या वातावरणात आणण्यात आले. कार्टोसॅट-2 या सॅटेलाइटचं प्रक्षेपण 10 जानेवारी 2007 रोजी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. देशाची हाय रेझोल्युशन छायाचित्रे घेता यावीत. त्या माध्यमातून रस्ते बनवता यावेत. नकाशे तयार करता यावेत, या उद्देशाने हा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला होता.
Cartosat-2: Atmospheric re-entry
🛰️ Cartosat-2, ISRO's high-resolution imaging satellite, bid adieu with a descent into Earth's atmosphere on February 14, 2024, as predicted.
ISRO had lowered its orbit from 635 km to 380 km by early 2020.
This strategic move minimized space… pic.twitter.com/HJCWONymS9
— ISRO (@isro) February 16, 2024
या उपग्रहाचं आयुर्मान 5 वर्षांचं होतं. मात्र तो 12 वर्षे सक्रिय राहिला. अखेरीस 2019 मध्ये या उपग्रहाला डिअँक्टिव्हेट करण्यात आले होते. हा हाय रेझोल्युशन इमेजिंग सॅटेलाइट मालिकेतील दुसऱ्या पिढीतील उपग्रह होता. 680 किलोग्रॅम वजनाचा हा सॅटेलाइट सन-सिंनक्रोनस पोलर ऑर्बिटमध्ये पृथ्वीपासून 635 किमी उंचीवर तैनात करण्यात आला होता. 2019 पर्यंत या उपग्रहाने देशाची उत्तमोत्तम छायाचित्रे टिपली होती. कार्टोसॅट-2 हा 30 वर्षांनी नैसर्गिकरीत्या पृथ्वीवर कोसळेल, असे सांगण्यात येत होते.
इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क सेंटरच्या सिस्टिम फॉर सेफ अँड सस्टेनेबल स्पेस ऑपरेशन्सच्या टीमने कार्टोसॅट-2 ला पृथ्वीवर समुद्रापर्यंत यशस्वीरीत्या आणले. 14 फेब्रुवारी रोजी हा उपग्रह पृथ्वीपासून 130 किमी अंतरावर असताना इलेक्ट्रिकल पॅसिव्हेशन यशस्वीरीत्या करण्यात आले होते. त्यानंतर कार्टोसॅट-2 हळुहळू पृथ्वीच्या दिशेने आला. 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3.45 दरम्यान, हा उपग्रह हिंदी महासागरात यशस्वीरीत्या पाडण्यात आला. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच या उपग्रहाचे बहुतांश भाग जळून खाक झाले. कार्टोसॅट-2 ला यशस्वीपणे जलसमाधी देत भारताने अंतराळात होणाऱ्या अनेक दुर्घटनांशी शक्यता संपुष्टात आणली आहे.
ISRO high-resolution imaging satellite Cartosat-2
ISRO high-resolution imaging satellite Cartosat-2
ISRO high-resolution imaging satellite Cartosat-2
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements