आपण वेगवेगळ्या प्रकारचं मांस खातो. पण तुम्ही कधी कच्चे मांस खाल्लंय का? केरळमध्ये कुट्टीपुरम बसस्थानकावर अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती मांजरीच कच्चे मांस खाताना आढळली आहे. त्यानंतर या व्यक्तीची चौकशी करण्यात आली. या व्यक्तीने मांजरीचं मांस का खाल्लं ते आपण जाणून घेऊ या.
केरळच्या बसस्थानकावर मांजरीचं मांस खाणारी ही व्यक्ती आसामच्या धुबरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. ही व्यक्ती मानसिक आरोग्य समस्यांनी पीडित असल्याचं समोर आलंय. खूप भूक लागल्यामुळं तो मांजरीचं कच्चे मांस खात होता. या व्यक्तीला तालुका रुग्णालयात प्राथमिक तपासणीनंतर कोझिकोडच्या सरकारी मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
कुट्टीपुरम बसस्थानकावर एक व्यक्ती मांजरीचं कच्चे मांस खात होती. त्यामुळे आजुबाजूचे प्रवासी नागरिक घाबरले. त्यांनी तातडीने याची माहिती मलप्पुरममधील पोलिसांना माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या व्यक्तीची विचारपूस केली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याचं नाव देबोजित रॉय असल्याचं समजलं. तसंच तो आसाममधील असल्याचीही माहिती मिळाली. या व्यक्तीने गेल्या चार दिवसांपासून जेवण केलेलं नव्हतं. बसस्थानकावर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास तो खात असलेल्या पॅकेटमधून भयंकर दुर्गंधी येत होती. त्यामुळं जवळ असलेल्या दुकानदाराचं त्याच्याकडे लक्ष गेलं. तेव्हा हा भयंकर प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीस जेवण देण्यास सांगितलं आहे.
कुट्टीपुरमचे पोलिस निरीक्षक पी के पद्मराजन यांनी सांगितलं की, काही वर्षांपूर्वी हा माणूस घरातून बेपत्ता झाला होता. रविवारी सकाळी तो कुट्टीपुरम रेल्वे स्थानकाजवळ सापडला. चौकशी केल्यावर, पोलिसांना समजलं की, तो चेन्नईहून कोझिकोडला त्याच्या भावाकडे गेला होता. तेव्हा तो चेन्नईतूनच बेपत्ता झाला होता. एका वरिष्ठ पोलिसाने सांगितलं की, हा माणूस काही वर्षांपूर्वी आपलं राज्य सोडून केरळला पोहोचला होता. आम्ही फोन शोधून त्याच्या भावाचा चेन्नईत शोध घेतला. त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यानी सांगितलं की, देबोजित रॉय काही वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्याच्या भावाने पोलिसांना सांगितलं की, देबोजित रॉय मानसिक रूग्ण आहे. त्यानंतर पुढील तपासणीसाठी त्याला कोझिकोड मानसिक रुग्णालयात हलवण्यात आलंय.
Hungry man eats raw cat meat in Kerala
Hungry man eats raw cat meat in Kerala
Hungry man eats raw cat meat in Kerala
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements