हमासचा ‘कमांड सेंटर’ बेचिराख…
Hamas command in north Gaza
Israel–Hamas War : Hamas command in north Gaza : इस्रायली लष्कराने शनिवारी उत्तर गाझा पट्टीतील हमासचे कमांड सेंटर उद्ध्वस्त केले (Hamas command in north Gaza destroyed by Israel). इस्रायल लष्कराचे वतीने डॅनियल हगरी यांनी ही माहिती दिली आहे. आम्ही उत्तर गाझा पट्टीतील हमासच्या लष्करी कमांड सेंटर उडवून संपूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. पॅलेस्टिनी आता या भागात खूपच कमी प्रमाणात कमांडरशिवाय कार्यरत आहेत. आता आमचे लक्ष गाझा पट्टीच्या मध्यभागी आणि गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील हमासचा खात्मा करण्यावर आहे, या कामाला थोडा वेळ लागेल, असेही ते म्हणाले.
ऑक्टोबर महिन्याच्या 7 तारखेला इस्रायलवर इतिहासातील सर्वात विध्वंसकारी हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझामधील हमासच्या शासनकर्त्यांना चिरडून टाकण्याची घोषणा केली होती. एएफपीच्या आकडेवारीनुसार सुमारे इस्रायलच्या 1 हजार 140 लोक मरण पावले, त्यापैकी बहुतांश सामान्य नागरिक होते. इस्रायलच्या दाव्यानुसार हमासने सुमारे 250 लोकांना ओलीस ठेवले होते, त्यापैकी 132 अजूनही कैद असल्याचे इस्रायलने सांगितले आहे.
हमासने चालवलेल्या गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ‘इस्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत किमान 22 हजार 722 लोक मारले गेले आहेत. यामध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.’ मध्य आणि दक्षिण गाझा पट्टीमध्ये हमासवर कारवाया करण्याच्या लष्करी प्रयत्नांबद्दल बोलताना हगेरी म्हणाले, मध्य गाझा पट्टीतील निर्वासित शिबिरे संकुल लोकांनी भरलेली आहेत, यात दहशतवादीही आहेत.”
हल्ल्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, इस्राईल सरकारने हमासला संपवण्याची, सर्व ओलीसांना परत करण्याची आणि गाझाचा पुन्हा कधीही इस्रायलला धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना लष्कराला दिल्या आहेत. आपण आपली सर्व उद्दिष्टे साध्य करेपर्यंत युद्ध थांबू नये, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
Hamas command in north Gaza
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements