धोनीचं ‘देशप्रेम’ Viral Video
Lakshadweep Vs Maldives
Video : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांबद्दल अपमानजक भाषा वापरल्यामुळं मालदीव सरकारमधील मंत्र्यांचा निषेध केला जात आहे. वादग्रस्त विधानांमुळं मालदीव मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. बॉलिवूड कलाकारांसह क्रीडा विश्वातील दिग्गजांनी मालदीवमधील प्रमुख व्यक्तींच्या विधानाविरोधात आवाज उठवला. अशातच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कॅप्टन कूलचं देशप्रेम दिसते (Explore India first).
लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना देण्याच्या विरोधात त्यांच्या अपमानास्पद आणि वर्णद्वेषी टिप्पण्यांबद्दल भारतीय आणि पंतप्रधान मोदी यांच्या टीकेच्या दरम्यान 3 मंत्र्यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी मालदीव विरोधात आवाज उठवल्यानंतर मालदीव सरकारनं हे पाऊल उचलले. मालदीव सरकारमधील मंत्र्यांनीच अपमानजनक भाषा वापरल्यानं भारतीय संतापले. कलाकारांसह खेळाडूंनी निषेध व्यक्त केला. अनेकांनी ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा देत देशातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी आवाज उठवला. मात्र, धोनीचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला, ज्यामध्ये धोनी परदेशी पर्यटनापेक्षा देशातील पर्यटनाला प्राधान्य द्यायला हवं असं म्हणतो.
First priority for Indian tourism places then others. This is why MS Dhoni is GOAT 🇮🇳❤#ExploreIndianIslands #Maldives pic.twitter.com/8iOvsmEs5h
— ` (@WorshipDhoni) January 7, 2024
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की धोनी म्हणतो, “मी केवळ सुट्टीनिमित्त नाही तर अनेकदा इतरत्र प्रवास करत असतो. खरं सांगायचं तर तर मी जास्त सुट्टीचा अर्थात Holiday प्लान केला नाही. मी क्रिकेटमध्ये सक्रिय असताना ज्या देशात जायचो तिथं फक्त क्रिकेट खेळायचो. मी परदेशी देशांमध्ये खूप काही पाहिलं नाही कारण मी केवळ क्रिकेटसाठी तिथं जायचो. क्रिकेट खेळायचं आणि परतायचं असं माझं नियोजन असायचं. पण, माझ्या पत्नीला फिरायला फार आवडतं. त्यामुळं आता आमचा एक प्लान आहे, त्यानुसार नियोजन सुरू आहे. पण आम्हाला सुट्टीची सुरूवात भारतातील पर्यटन क्षेत्रापासूनच करायची आहे. कारण आपल्या देशात इथे खूप सुंदर ठिकाणं आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यापूर्वी मला याबद्दल सांगायला नक्कीच आवडेल.”
Explore India first MS Dhoni Video
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements