DKS accuses HDK of buying MLA votes
DK Shivakumar : JD(S) making offers to Congress MLAs ahead of Rajya Sabha election
कर्नाटक—belgavkar Rajya Sabha Election 2024 : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आमच्या आमदारांना आमिष दाखवत धमक्याही देत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला. सोमवारी विधानसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, कुमारस्वामी कोणाला फोन करत आहेत, ते काय बोलत आहेत, ते कोणाला धमकावत आहेत, सर्व काही आम्हाला माहीत आहे. कुमारस्वामी यांनी कोणाला आणि कोणती ऑफर दिली याची माहिती आमदारांनी दिली आहे (Rajya Sabha polls: DK Shivakumar accuses HD Kumaraswamy of trying to buy votes).
DKS accuses HDK of buying MLA votes : आपल्याला भाजपची रणनीतीही माहीत आहे. त्यांनी आधी त्यांचे घर सावरावे. राज्यसभा निवडणुकीत धजदने उद्योगपती कुपेंद्र रेड्डी यांना पाचवे उमेदवार म्हणून उभे केले आहे. त्यांना विजयासाठी सहा ते सात अतिरिक्त मतांची गरज आहे. हे मिळवण्यासाठी काँग्रेस आमदारांना आमिष दाखविले जात आहे. विरोधी पक्ष क्रॉस व्होटिंगसाठी प्रयत्न करत आहेत का, असे विचारले असता, ते उगाच पाचवा उमेदवार रिंगणात उभा का करतील? एक प्रयत्न करायचा म्हणून अर्ज दाखल केला आहे. मतदानाच्या दिवशी सर्व काही कळेल.
विरोधी पक्षांच्या रणनीतीला तुम्ही काउंटर स्ट्रॅटेजी आखणार का, असे विचारले असता, आम्हाला त्याची गरज नाही. लोकांनी आम्हाला 136 जागा दिल्या आहेत. दोन मतदारसंघांतील अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत. आता आमच्यासोबत असलेल्या इतर कोणाबद्दल आम्ही बोलणार नाही. मतदानानंतर बोलू, असे ते म्हणाले.
सत्तारूढ काँग्रेसमधील नाराजीचा लाभ घेण्याच्या हिशोबाने राज्यसभा निवडणुकीत भाजप-निजद युतीचा पाचवा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. त्यामुळे आता बिनविरोधऐवजी निवडणुकीने राज्यसभा सदस्य निवडला जाणार आहे (4 seats, 5 candidates: Karnataka Rajya Sabha polls may see climax).
कर्नाटकातील राज्यसभेच्या 4 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. याकरिता भाजपतर्फे नारायणसा भांडगे यांनी गुरुवारी उमेदवारी दाखल केली. त्यानंतर काही मिनिटांतच निजदचे ज्येष्ठ नेते कुपेंद्र रेड्डी यांनी उमेदवारी दाखल केली. त्यांच्याबरोबर माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, काही भाजप नेते उपस्थित होते. संख्याबळाच्या आधारे काँग्रेसला 3 जागा सहजपणे मिळू शकतात. या हिशोबानेच अजय माकन, नासीर हुसेन आणि जी. सी. चंद्रशेखर यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. त्या तिघांनी उमेदवारी दाखल केली आहे.
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला 45 मतांची गरज आहे. या हिशोबानुसार काँग्रेसला (135 आमदार) 3 जागा मिळणार हे निश्चित आहे. भाजपकडे 65 आमदार असून 45 मतांच्या आधारे एक राज्यसभा निवडून येणे शक्य आहे. उर्वरित 20 मते आणि निजदची 19, कल्याण राज्य प्रगती पक्षाचे 1, अपक्ष 2, सर्वोदय कर्नाटक पक्षाचे 1 मत तसेच काँग्रेसमधील नाराजांची मते मिळवून पाचव्या उमेदवाराच्या विजयाचा विश्वास युतीला आहे.
काँग्रेसला विजयाचा विश्वास : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी भाजप-निजद युतीबाबत बोलताना 27 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहिल्यानंतरच कॉंग्रेसची रणनीती काय ते समजेल, असे सांगितले. विधानसभेत अपयशी ठरल्याने ते दोन पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेसचे तिन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Karnataka DKS accuses HDK of buying MLA votes belgavkar news explore digital india
DKS accuses HDK of buying MLA votes
DKS accuses HDK of buying MLA votes
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements