नवी दिल्ली : लोकसभेतील कर्नाटकाचे काँग्रेस खासदार डी. के. सुरेश यांच्या कथित विभाजनवादी वक्तव्यामुळे काँग्रेसची संसदेत कोंडी झाली. सुरेश यांच्या विधानापासून काँग्रेसने स्वत:ला अलिप्त केले तरीही, भाजपच्या टीकेचा आक्रमक प्रहार थेट पक्षाध्यक्ष व राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांना सहन करावा लागला. मात्र, हा मुद्दा बाजूला ठेवत झारखंडच्या मुद्दयावरून विरोधकांनी सभात्याग केल्यामुळे सत्ताधारी बाकांवर संतापाची लाट उसळली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या लेखानुदानावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के.
शिवकुमार यांचे बंधू व काँग्रेसचे खासदार डी. के. सुरेश यांनी, ‘केंद्राने करातील योग्य वाटा राज्यांना दिला नाही तर नाइलाजाने दक्षिणेकडील राज्यांना वेगळया राष्ट्राची मागणी करण्याशिवाय पर्याय उरणार नाही’, अशी आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली होती. त्यावर राज्यसभेत गटनेते पीयूष गोयल व लोकसभेत केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आक्षेप घेत काँग्रेसच्या माफीची मागणी केली. या मुद्दयावरून काँग्रेस व भाजपमध्ये सभागृहांत हमरातुमरी झाली.
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी गोयल यांना संबंधित विधानाचा पुरावा सभागृहाच्या पटलावर ठेवण्यास सांगून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी डी. के. सुरेश यांच्या विधानावर खेद व्यक्त केला नसला तरी, काँग्रेसचे पक्षाध्यक्ष या नात्याने सुरेश यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला दूर केले.
विरोधकांच्या सभात्यागामुळे भाजप अचंबित : ‘सुरेश हे लोकसभेचे सदस्य असून तिथे गटनेते या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आक्षेप घेऊन तिथल्या सभागृहात चर्चा करावी’, हा विरोधाचा मुद्दा सभापती धनखड यांनी फेटाळला. त्याचवेळी खरगेंनी झारखंडमधील राज्यपालांच्या भूमिकेवर शंका उपस्थित करून चर्चेची मागणी केली आणि त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांच्या सभात्यागामुळे सुरेश यांचा मुद्दा अचानक बाजूला पडला. विरोधकांच्या या कृतीमुळे भाजपचे सदस्य अचंबित झालेले दिसले.
Congress Mp Dk Suresh Separate Country Remark
Congress Mp Dk Suresh Separate Country Remark
Congress Mp Dk Suresh Separate Country Remark
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements