Karnataka Congress candidate wins Legislative Council bypoll, setback for BJP-JD(S) alliance
कर्नाटक Legislative council by-election: Congress candidate Puttanna triumphs in Teachers constituency : लोकसभा निवडणुकीआधी भाजपने जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाला एनडीएमध्ये घेतलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत एनडीएला फायदा होईल, अशी गणितं मांडली जात होती. पण पहिल्याच परीक्षेत ही आघाडी फेल ठरली आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराचा काँग्रेसने पराभव करत पहिला दणका दिला आहे. (Karnataka : Congress records first win against BJP-JD(S) alliance in Legislative Council bypoll)
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) उमेदवार पी. पुट्टण्णा (P. Puttanna) यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजप-जेडीएसचे उमेदवार ए. पी. रंगनाथ यांचा दीड हजार मतांनी पराभव केला. बंगळुरू शिक्षक मतदारसंघात 16 फेब्रुवारीला झालेल्या मतदानात 14432 जणांनी मतदान केले होते.
पुट्टण्णा यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत बंगळुरू शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवला होता. या वेळी त्यांनी भाजपच्या (BJP) तिकीटावर निवडणूक लढवली होती. पण त्यांनी मागील वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पोटनिवडणूक झाली. ही निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवूनही ते विजयी झाले. विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसने भाजपला धूळ चारली होती. त्यानंतर आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी भाजपने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात जेडीएससोबत आघाडी केली. या आघाडीनंतर पहिलीच निवडणूक झाली. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यामध्ये काँग्रेसला यश मिळाले आहे. भाजप आणि जेडीएससाठी हा धक्का मानला जात आहे.
कर्नाटकमध्ये मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसला 224 पैकी 135 जागांवर विजय मिळाला, तर भाजपला केवळ 66 जागा मिळाल्या होत्या. जेडीएसला केवळ 19 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे पारडे जड मानले जात आहे.
Congress candidate Puttanna wins in Teachers constituency
Congress candidate Puttanna wins in Teachers constituency
Congress candidate Puttanna wins in Teachers constituency
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements