पणजी : गोव्यातील प्रसिद्ध अशा चौगुले समुहाच्या चौगुले ॲंड कंपनी प्रा. लि. ची ₹ 1075 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने कंपनीच्या दोन आर्थिक सल्लागारांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौगुले हे मूळचे बेळगावचे असून, त्यांनी सुरुवातीला गोव्यात खाण व्यवसायात पाऊल ठेवले त्यानंतर ते तेथील मोठे उद्योजक बनले. चौगुले कंपनीची विदेशात चालणार्या रुद्रा कंपनीने प्रताप शिर्के (नातेवाईक / जावई) यांच्या इंग्लंडमधील कंपनीला सुमारे एक हजार कोटींचे कर्ज दिले होते.
चौगुलेचे आर्थिक सल्लागार विजय चौगुले (वय 77) आणि रोदीप महात्मे यांनी संचालक मंडळाला तसे निर्देश दिल्यानंतर प्रताप शिर्केंच्या कंपन्यांना हे कर्ज देण्यात आले होते. शिर्के यांच्या शिपिंग कंपनीत गुंतवणुकीच्या नावाने दिलेल्या या कर्जाला संचालक मंडळाने मान्यता दिलेली नव्हती. त्यानंतर चौगुले, महात्मे आणि शिर्के यांच्या सांगण्यानुसार शिर्केंच्या कंपन्यांचे कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे कंपनीचे 1 हजार कोटींचे नुकसान झाले, असे हर्ष शहा यांनी आर्थिक गुन्हे विभागाकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, यांच्या तक्रारीची चौकशी करून विभागाने विजय चौगुले (चौगुले हाऊस, बायणा, वास्को), रोदीप महात्मे (आल्तिनो, पणजी), प्रताप शिर्के (युनायटेड किंगडम) यांच्यासह फोर्ट ग्रुप, मारिया पुंचेर (लिक्टनस्टाईन) आणि ज्ञात व अज्ञात असोसिएटस् यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शिरोडकर याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
Chowgule and Shirke group Fraud London Goa
Chowgule and Shirke group Fraud London Goa
Chowgule and Shirke group Fraud London Goa
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements