कर्नाटक-बंगळूर : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारी सुरू झाले. राज्यपाल थावरचंद गेहलोत त्यांचे भाषण संपत असतानाच भाजप आमदारांनी ‘जय श्री राम’ आणि काँग्रेसच्या आमदारांनी ‘जय भीम’ ची घोषणा केल्याची घटना घडली. भाजप आमदारांनी भगवी शाल परिधान करून अधिवेशनात सहभाग घेतला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांनी सभागृहाला संबोधित केले. राज्यपालांनी जय हिंद, जय कर्नाटक, धन्यवाद म्हणताच भाजप सदस्यांनी ‘जय श्री राम’चा जयघोष केला (BJP legislators chant ‘Jai Sri Ram’ after address by Karnataka Governor).
दरम्यान, राष्ट्रगीत वाजवण्यात आले. एनडीए आघाडीतील धजद सदस्य कोणतीही घोषणा न करता तटस्थ राहिले. विधानसभेत भाजपच्या सदस्यांनी भगवा शाली परिधान केली असली तरी धजदच्या सदस्यांनी भगव्यापासून अंतर राखल्याचे दिसून आले. तत्पूर्वी, विधानसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्यासाठी आलेले राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे परंपरेप्रमाणे स्वागत करण्यात आले.
राजभवन येथून विशेष वाहनाने आगमन झाल्यावर त्यांना शिष्टाचारानुसार आमदार निवासाच्या प्रवेशद्वारावर ताफ्याने आणले. विधानसौधसमोर आल्यानंतर राज्यपालांचे विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर, विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
BJP legislators chant Jai Sri Ram Karnataka Assembly
BJP legislators chant Jai Sri Ram Karnataka Assembly
BJP legislators chant Jai Sri Ram Karnataka Assembly
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements