बेळगाव-सदलगा (चिकोडी) : येथे नदीच्या जॅकवेल रस्त्यावर मातीखाली दबलेले पुरातन मंदिर स्वच्छता अभियानावेळी सापडले. आरएसएस (RSS) व भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांच्या स्वच्छता अभियानात हे मंदिर आढळले. याचे पुरातन नाव सीताराम मंदिर (Sitaram Temple) असल्याचे सांगितले जाते.
सदलगा येथे हे जुने मंदिर आहे. अलीकडे नदीकाठावर पाणी येऊन ते मंदिर मातीखाली दबले होते. याची स्वच्छता करण्याचे ठरवून कार्यकर्त्यांनी ती केली. यावेळी नूतन मंदिर खोदाईत सापडले अशी अफवा उठल्याने त्याची चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात स्वच्छता मोहिमेत या मंदिराची स्वच्छता झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. मंदिराच्या नावावरून वेगवेगळे तर्क बांधले जात आहेत. त्याबाबतही आणखी माहिती घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनीही भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
मंदिर स्वच्छतेपूर्वी गावातील ज्येष्ठ मंडळींच्या मते हे सीताराम मंदिर असून तेथे माती खोदाई करून काढल्यास ते सापडेल, असे सांगितल्याने कार्यकर्त्यांनी ते मंदिर शोधल्याचे सांगितले जाते. सोमवारी स्वच्छता केली असून मंदिरात पादुका असल्याचे सांगितले जाते. भाजपचे मंडल अध्यक्ष संजय पाटील, अतिक्रांत पाटील, कुमार सकपाळे, भूषण खोत, बाळू उगारे आदी उपस्थित होते.
belgaum temple found river sadalaga chikodi
belgaum temple found river sadalaga chikodi
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements