Belgaum Mayakka Devi Yatra at Chinchali Raibag
बेळगाव—belgavkar : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचली (ता. रायबाग, जि. बेळगाव) येथील श्री मायाक्का (माकुबाई) देवीची यात्रा (शनिवार 24 फेब्रुवारी ते रविवार 3 मार्च) अखेर होणार असल्याची माहिती श्री मायाक्का देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे. या यात्रेत सुमारे 5 लाख भाविक उपस्थित राहणार असल्याने कुडची, रायबाग पोलिस व देवस्थान समितीने यात्रेसाठी नियोजन सुरू केले आहे.
यात्रेत भंडारा व खोबरे यांची हजारो टनाची उधळण होत असते. ही यात्रा रविवार 3 मार्चअखेर भरणार आहे. सौंदत्ती श्री रेणुकादेवी यात्रेला गेलेले सर्व भाविक या यात्रेत सहभागी होतात.
उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध शक्ती, व नवसाला पावणारी देवी असलेली श्री मायाक्का देवीची यात्रा ही महिनाभर चालते. प्रत्येक वर्षी ही यात्रा भारत पौर्णिमेच्या दिवशी सुरवात होते व यात्रेच्या चौथ्या दिवशी श्री मायाक्का देवीची पालकी मिरवणूक कार्यक्रम होतो. ही यात्रा प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो भक्त श्री मायाक्का दर्शनासाठी यात्रेच्या काळात येतात. महाराष्ट्रातील, कोकण भागासह, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई, नाशिक, बीड यासह कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, बागलकोट, गुलबर्गा या जिल्यातील भाविक प्रत्येक वर्षी यात्रा काळात स्वच्छ भावनेने चिंचली येथे श्री मायाक्का दर्शनासाठी येतात.
Belgaum Mayakka Devi Yatra at Chinchali Raibag belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Mayakka Devi Yatra at Chinchali Raibag
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements