बेळगाव—belgavkar : शहर व ग्रामीण भागातील सरकारी अनुदानित व विनाअनुदानित शाळांत कोणतेही खासगी कार्यक्रम व उपक्रम राबवायचे असल्यास शिक्षण खात्याकडून नवी मार्गसूची लागू करण्यात आली आहे. कर्नाटकाच्या बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथील अलगूर येथे स्नेहसंमेलनाहून परतताना स्कूल बसला ट्रॅक्टरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता (सागर कडकोळ (17), श्वेता (13), गोविंद (13) आणि बसवराज (17) अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण कवटगी येथील रहिवासी होते). त्यामुळे शिक्षण खात्याने नियमांचे पालन करून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना दिल्या आहेत.
शिक्षण खात्याच्या परवानगीशिवाय शाळेत कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करू नये. सर्व कार्यक्रम शाळेच्या वेळेतच घेण्यात यावेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय स्थानिक सुट्टी जाहीर करू नये. शाळेच्या स्कूल बसचा विमा भरणे सक्तीचे असणार आहे. बसच्या वेगावर चालकाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांना घेऊन प्रवास करू नये. वाहन चालकाकडे चालक परवाना आवश्यक आहे. चालकाची वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळा किंवा संस्थेची असणार आहे.
स्कूल बसमध्ये प्रथमोपचार सुविधा असणे बंधनकारक आहे. संबंधित शाळेने किंवा संस्थेने बसला जीपीएस यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. परिवहन महामंडळात स्कूल बसची शाळेने नोंदणी करून घ्यावी. शाळेच्या आवारात कोणत्याही व्यक्तीसोबत किंवा अनोळखी व्यक्ती सोबत शाळेच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधू नये. माध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांनी माध्यान्ह आहार खोलीची स्वच्छता ठेवावी. या खोलीत विद्यार्थ्यांना प्रवेश निषेध करावा. शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना बाहेर सोडू नये. शाळा सोडल्यानंतर रस्ता ओलांडताना संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी व क्रीडाशिक्षकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थी व पालकांना यासंबंधी सूचना द्याव्यात. शाळा व आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे.
Belgaum Education Dept guidelines to School belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Education Dept guidelines to School
Belgaum Education Dept guidelines to School
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements