केरळच्या दूरदर्शन चॅनलवर सुरु असलेल्या लाइव्ह शो दरम्यान एक कृषी तज्ञ अचानक बेशुद्ध पडले आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केरळ कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. अनी एस दास (59 वर्षे) यांनी एका कार्यक्रमाच्या लाइव्ह चर्चेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमात जिथे प्रश्नोत्तरादम्यान ते अचानक बेशुद्ध झाले (Agricultural services expert Dr Ani S Das).
त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. शुक्रवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास अनी एस दास बेशुद्ध झाल्याची घटना घडली. कृषी तज्ज्ञ डॉ. अनि एस दास यांनी कृषी दर्शन कार्यक्रमाला सहभागी झाले होते. लाइव्ह कार्यक्रम सुरू असताना ते अचानक गप्प झाले आणि बसलेल्या खुर्चीवर मागे झुकले. लाइव्ह सुरु असलेली चर्चा तात्काळ थांबवण्यात आलेीआणि त्यांना तातडीने वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मात्र त्यांचया मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
डॉ. अनी एस दास हे कोल्लम जिल्ह्यातील रहिवासी होते आणि ते केरळच्या कृषी विद्यापीठात प्राध्यापक होते. यासह, ते लाइव्हस्टॉक अँड अँग्रीकल्चर सर्व्हिसेसचे एक्झीक्यूटीव्ह डायरेक्टर (KLDB) होते. डॉ. अनी एस दास यांनी यापूर्वी देखील अनेकदा दूरदर्शनवरील शेतीशी संबंधित कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.
Agricultural services expert Dr Ani S Das collapses and dies during Doordarshan programme
Agriculture expert collapses and dies during live Doordarshan program
Agricultural services expert Dr Ani S Das
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements