बेळगाव—belgavkar @कर्नाटक Rajya Sabha Election 2024 : सत्तारूढ काँग्रेसमधील नाराजीचा लाभ घेण्याच्या हिशोबाने राज्यसभा निवडणुकीत भाजप-निजद युतीचा पाचवा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. त्यामुळे आता बिनविरोधऐवजी निवडणुकीने राज्यसभा सदस्य निवडला जाणार आहे (4 seats, 5 candidates: Karnataka Rajya Sabha polls may see climax).
कर्नाटकातील राज्यसभेच्या 4 जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. याकरिता भाजपतर्फे नारायणसा भांडगे यांनी गुरुवारी उमेदवारी दाखल केली. त्यानंतर काही मिनिटांतच निजदचे ज्येष्ठ नेते कुपेंद्र रेड्डी यांनी उमेदवारी दाखल केली. त्यांच्याबरोबर माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, काही भाजप नेते उपस्थित होते. संख्याबळाच्या आधारे काँग्रेसला 3 जागा सहजपणे मिळू शकतात. या हिशोबानेच अजय माकन, नासीर हुसेन आणि जी. सी. चंद्रशेखर यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. त्या तिघांनी उमेदवारी दाखल केली आहे.
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला ४५ मतांची गरज आहे. या हिशोबानुसार काँग्रेसला (१३५ आमदार) 3 जागा मिळणार हे निश्चित आहे. भाजपकडे ६५ आमदार असून ४५ मतांच्या आधारे एक राज्यसभा निवडून येणे शक्य आहे. उर्वरित २० मते आणि निजदची १९, कल्याण राज्य प्रगती पक्षाचे 1, अपक्ष 2, सर्वोदय कर्नाटक पक्षाचे 1 मत तसेच काँग्रेसमधील नाराजांची मते मिळवून पाचव्या उमेदवाराच्या विजयाचा विश्वास युतीला आहे.
काँग्रेसला विजयाचा विश्वास : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी भाजप-निजद युतीबाबत बोलताना २७ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहिल्यानंतरच कॉंग्रेसची रणनीती काय ते समजेल, असे सांगितले. विधानसभेत अपयशी ठरल्याने ते दोन पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेसचे तिन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
5 candidates Karnataka Rajya Sabha polls
5 candidates Karnataka Rajya Sabha polls
5 candidates Karnataka Rajya Sabha polls
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements