500 च्या नोटेवर आता श्रीरामाचा फोटो? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य Fact Check
22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा सोहळा होत असतानाचं भगवान श्री राम आणि अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या फोटोसह ₹ 500 रुपयांच्या नोटेचा फोटो व्हायरल होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्री रामाच्या चित्रासह ₹ 500 रुपयांची नवीन नोट जारी करणार आहे. अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (राम मंदिर दर्शनासाठी कधीपासून खुले?).
फोटोमध्ये महात्मा गांधींऐवजी भगवान श्रीरामाचा फोटो आहे. असा दावा केला जात आहे की, राम मंदिराच्या सोहळ्यापूर्वी सरकारने नवीन नोटांवरून महात्मा गांधींचे चित्र काढून त्याजागी भगवान श्रीरामाचे चित्र लावण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे ही नोट व्हायरल होत आहे, मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रभू श्री रामाचे चित्र असलेल्या 500 रुपयांच्या नव्या नोटे बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भगवान श्रीरामाच्या फोटोसह व्हायरल होत असलेली 500 रुपयांची नोट बनावट आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी आणखी काही चित्रांसह 500 रुपयांच्या नव्या नोटा बाजारात येणार असल्याच्या अफवा आल्या होत्या. जून 2022 मध्ये, आरबीआय सध्याच्या चलन आणि बँक नोटांमध्ये महात्मा गांधींचे चित्र बदलून रवींद्रनाथ टागोर आणि मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती एपीजे कलाम यांच्या चित्रांसह नवीन नोटा छापण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र या पोस्ट खोट्या होत्या. त्यानंतर या वृत्ताचे खंडन करण्यासाठी आरबीआयला पुढे यावे लागले. तेव्हा आरबीआयने असा कोणताही प्रस्ताव आरबीआयसमोर नसल्याचे सांगितले होते.
FACT CHECK: False claims circulate about new Rs. 500 note featuring Lord Ram, Ram Mandir
series of photos depicting 500 rupee notes featuring images of Lord Ram and the Ram Mandir in Ayodhya are circulating online with false claims
₹500 Note With Lord Ram Ayodhya Portrait
₹500 Note With Lord Ram Ayodhya Portrait
₹500 Note With Lord Ram Ayodhya Portrait
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements