बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अंजुमन बिल्डींगमध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून 8 लाख 65 हजार 500 रुपये पळविणाऱ्या तरुणाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून 5 लाख 74 हजार रुपये रोकड व 1 लाख 56 रुपये किमतीचे एक मंगळसूत्र असा एकूण 7 लाख 30 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कृष्णा सुरेश देसाई (वय 23, रा. ज्योतीनगर, कंग्राळी खुर्द) असे त्याचे नाव असून एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी बँकेचे कंत्राट घेतलेल्या एका कंपनीचा तो कामगार आहे. एटीएमचे कॉम्बिनेशन पासवर्ड वापरुन त्याने मोठी रक्कम चोरल्याचे आयुक्तांनी सांगितले. दि. 30 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती.
मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक महांतेश मठपती, विठ्ठल हावण्णावर, एच. एल. केरुर, हवालदार लक्ष्मण कडोलकर, शंकर कुगटोळी, आय. एस. पाटील, नवीनकुमार, शिवाप्पा तेली, रमेश अक्की आदींनी ही कारवाई केली आहे. एटीएममध्ये रक्कम जमा करण्यासाठी कंत्राट घेतलेल्या खासगी कंपनीचा कृष्णा हा कर्मचारी आहे. रक्कम जमा करण्यासाठी एक कॉम्बिनेशन पासवर्ड असतो. त्या पासवर्डचा वापर करून त्याने रक्कम चोरल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
एटीएममधील रक्कम चोरल्यानंतर याच पैशातून कृष्णाने आपल्या पत्नीला 20 ग्रॅमचे मंगळसूत्र घेतले.
Youth arrested Rs 8 lakh from Belgaum ATM
Youth arrested Rs 8 lakh from Belgaum ATM
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements