WhatsApp new text formatting tools
आपण सगळेच व्हॉट्सॲप वापरतो. या ॲपवरून आपण आपल्या जवळच्या लोकांशी संपर्कात असतो. शिवाय कामाचे काही मेसेज असतील तर ते देखील आपण व्हॉट्सॲपवरून पाठवतो. या व्हॉट्सॲपमध्ये आता थोडा बदल झाला आहे. व्हॉट्सॲपने नवं फिचर आणलं आहे. या फिचरमुळे चॅटिंग करणं आणखी सोपं होणार आहे. 2024 या वर्षात व्हॉट्सॲपने बरेच नवे बदल केले. आता त्यांनी नवी घोषणा केली आहे. या नव्या फिचरबद्दल आपण जाणून घेऊयात… (WhatsApp new text formatting tools)
व्हॉट्सॲपने एक कमाल फिचर आणलं आहे. ज्यामुळे तुम्ही नंबर लिस्ट करू शकता. याआधी आपण चॅटिंग करताना एका एका ओळीला नंबर द्यावा लागत होता. आता मात्र तसं करण्याची गरज नाही. तुम्ही पहिल्या ओळीला नंबर दिला. त्यानंतर तुमचा मजकूर टाईप केला आणि त्यानंतर स्पेस देऊन इंटर केलं आणि दुसरी ओळ लिहिली की त्या ओळीला आपोआप नंबर येईल. तसंच तिसऱ्या ओळीलाही आपोआपच नंबर येईल. तुम्हीही हे फिचर ट्राय करा. तुमचा वेळ वाचेल.
व्हॉट्सॲपमध्ये आता नंबर लिस्ट आपोआप काम करेल. जसं विंडोजमध्ये टाईप केल्यावर नंबर लिस्ट येते. तसंच आता व्हॉट्सॲपमध्ये सुद्धा होणार आहे. व्हॉट्सॲपवर चॅटिंग करताना तुम्हाला जर एखाद्या टेस्टच्या आधी बुलेट वापरायचं असेल तर तोही ऑप्शन मिळणार आहे. चॅटिंग करताना पहिल्या ओळीला बुलेट लावलं तर पुढच्या ओळींना आपोआप बुलेट येणार आहे.
कोणत्या फोनमध्ये हे फिचर आहे? : ॲन्ड्रॉईड आणि अॅपल या दोन्ही फोनमध्ये हे फिचर ॲव्हेलेबल होणार आहे. व्हॉट्सॲपबद्दल माहिती देणाऱ्या WABetainfo या वेबसाईट नुसार हे फिचर बीटा व्हर्जनमध्ये टेस्ट केलं गेलं आहे. ॲन्ड्रॉईड आणि अॅपल या फोनच्या बीटा व्हर्जनमध्ये याचं टेस्टिंग झालं आहे. ॲन्ड्रॉईड आणि अॅपल यामध्ये हे फिचर असणार आहे. व्हॉट्सॲपच्या या फिचरला बोल्ड, इटॅलिक, स्ट्राइकथ्रू आणि अंडरलाईन फिचरच्या शिवाय टेक्स्ट अरेंज करण्यासाठी ब्लॉक्स, बुलेट लिस्ट, नंबर लिस्ट आणि कोट ब्लॉक या सारखे फिचर्स मिळतील. आता एखाद्या मॅचच्या कोणत्याही स्पेसिफिक पार्टला हाईलाईट करता येणार आहे.
WhatsApp new text formatting tools
WhatsApp new text formatting tools
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements