फलंदाज क्रीजच्या आत, तरीही OUT घोषित, VIDEO व्हायरल
Big Bash League (BBL)
Viral Video BBL Umpire OUT – Big Bash League (BBL) : ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्या बिग बॅश लीग 2023-24 मध्ये आतापर्यंत अनेक विचित्र घटन मैदानावर पाहायला मिळाली आहेत. या मोसमातील 28 वा सामना सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झाला (Melbourne Stars vs Sydney Sixers BBL Match). शनिवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात असे काही घडले, ज्याने संपूर्ण क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का बसला. सामन्यादरम्यान तिसऱ्या पंचाने चुकीचे बटण दाबले आणि त्यानंतर फलंदाजाला बाद घोषित केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मात्र या घटनेने क्रिकेट जगताला धक्का बसला असून आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना सिडनी सिक्सर्स संघ फलंदाजी करत असताना घडली. यादरम्यान मेलबर्न स्टार्सचा फलंदाज जेम्स विन्सने थेट गोलंदाज इमाद वसीमच्या दिशेने शॉट मारला. यानंतर चेंडू थेट स्टंपला लागला आणि विरोधी संघाने धावबाद होण्याचे अपील केले. त्यानंतर हे प्रकरण मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचाकडे पाठवले.
रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले की जोश फिलिप नॉन-स्ट्रायकरच्या एंडला चेंडू स्टंपवर आदळण्यापूर्वी क्रीजच्या आत पोहोचला होता, परंतु तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केल्याचे मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले. यामुळे मैदानावर उपस्थित खेळाडूंशिवाय स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक आणि सपोर्ट स्टाफही हे पाहून आश्चर्यचकित झाले. मात्र, यानंतर फलंदाजाला क्रीजवर थांबण्यास सांगण्यात आले आणि त्यानंतर त्याला नाबाद घोषित करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यूजर्स लीगला खूप ट्रोल करत आहेत.
He's pressed the wrong button! 🙈@KFCAustralia #BucketMoment #BBL13 pic.twitter.com/yxY1qfijuQ
— KFC Big Bash League (@BBL) January 6, 2024
या सामन्याबद्दल बोलायचे, तर मेलबर्न स्टार्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावून 156 धावा केल्या होत्या. सिडनी सिक्सर्सने हे लक्ष्य केवळ 18.1 षटकांत पूर्ण केले. सिडनीकडून जेम्स विन्सने 79 धावांची शानदार खेळी केली. विन्सने 57 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने शानदार खेळी साकारली. त्याच्याशिवाय डॅनियल ह्यूजने 32 चेंडूत 41 धावांचे योगदान दिले. या विजयानंतर सिडनी सिक्सर्सने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.
Viral Video BBL Umpire OUT
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements