Penalties for Underage Driving in India
कर्नाटक—belgavkar : अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास दिल्याने एका अपघात प्रकरणात मुलाच्या वडिलांना राणेबेन्नूर न्यायालयाने ₹ 27000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे राज्यभरात देखील अशा प्रकारची कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. अल्पवयीन युवक-युवती वाहतूक नियम धाब्यावर बसवत वाहने चालवत असल्याने सातत्याने लहान-मोठे अपघात घडत आहेत (Parents to be punished if minors found driving – police have warned up to Rs 25000 fine, legal action against parents).
Penalties For Parents Allowing Minors To Drive
गेल्या 30 जुलै रोजी राणेबेन्नूर शहरात हलगेरी क्रॉसनजीक मोटारसायकलला अपघात होऊन यामध्ये एक जण जखमी झाला. अपघाताची नोंद पोलिसांत झाली. दुचाकी चालविणारा चालक अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्याने, अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास देणाऱ्या वडिलांना राणेबेन्नूर वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने आणि जेएमएफसी न्यायालयाने 27000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या वडिलाच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
कर्नाटक राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रस्ते अपघात घडत आहेत. आजपर्यंतच्या अपघातामध्ये अल्पवयीनांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात असली तरी नियम मोडणाऱ्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही. न्यायालयाने कारवाई करण्याचा आदेश देईपर्यंत वाट न पाहता पोलिसांनाही कारवाईचा अधिकार आहे.
#UnderageDriving #TrafficLaws #India #RoadSafety #Karnataka #LegalAction #MinorsDriving #ParentsResponsibility #AccidentPrevention #TrafficViolations #YouthSafety #RoadAccidents #FineForParents #LegalConsequences #SafetyFirst #DrivingLaws #Enforcement #PublicAwareness #RoadRules #JusticeSystem Traffic Laws
Traffic Laws
Traffic Laws
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements