बेलवळेमध्ये फसवणूक; माजी उपसरपंचावरही गुन्हा. निव्वळ दिखावा; नोटांची छपाई नाही
कोल्हापूर-कागल Fake Note : तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केला. या प्रकरणी दोघांना अटक केली असून, एकाचा शोध सुरू आहे. नोटा छपाईच्या साहित्यासह सुमारे ₹ 1 लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दिली. पोलिसांनी सांगितले, की या प्रकरणी मेहरूम अल्ताफ सरकावस (वय 41), सलिल रफिक सय्यद (30, दोघेही रा. घटप्रभा, ता. गोकाक, बेळगाव) या दोघांना अटक केली आहे. तिसरा संशयित अशोक बापू पाटील (बेलवळे, ता. कागल) याचा शोध सुरू आहे. तो बेलवळेचा माजी उपसरपंच आहे.
दरम्यान, अटकेतील दोघांकडून नोटा छापणारे मशिन, कोरे कागद, काचेच्या पट्ट्या, चिकटटेप, असा एक लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. रविवारी रात्री पोलिसांनी कारवाई केली. याबाबतची फिर्याद उमेश तुकाराम शेळके (वय 33, रा. तळेगाव दाभाडे, पुणे) यांनी दिली. पैशाची गरज आहे, अशा व्यक्ती शोधून त्यांना दिलेल्या रकमेवर तिप्पट रक्कम देतो, असे सांगितले जात होते. पैसे कसे छापले जातात, याची माहिती त्यांना व्हिडिओद्वारे दिली जात होती. यातूनच मेहरूम सरकावस हिने अशोक पाटील याच्या सांगण्यावरून तिच्या मोबाईलवरून फिर्यादी उमेश शेळके यास कॉल केला. रक्कम कशी देतो, याचा व्हिडिओ पाठवून दिलेल्या रकमेच्या तिप्पट रक्कम देतो, असे सांगितले. तिने त्याला अशोक पाटील याच्या मालकीच्या बेलवळे (ता. कागल) येथील फार्म हाउसवर 7 जानेवारी 2024 ला बोलवून घेतले. यावेळी मेहरूम व सलील यांनी उमेशकडून 500 रुपयांच्या नोटा असलेले ₹ 1 लाख रुपये स्वीकारले. त्या बदल्यात 3 लाख रुपये देतो, असे सांगितले.
कोऱ्या कागदाच्या बंडलाखाली आणि वर 500 रुपयांची एक-एक नोट लावली आणि अशी सहा बंडल देऊन 3 लाख रुपये असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात त्या सहा बंडलामध्ये 6000 रुपये होते. त्यामुळे 94000 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा पोलिसात नोंद करण्यात आला आहे. उत्तम शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक बापू पाटील, मेहरुम अल्ताफ सरकवास, सलील रफिक सय्यदविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बेलवळे (ता. कागल) येथे अशोक पाटील याच्या फार्म हाऊसवर रविवारी रात्री छापा टाकून मेहरुम अल्ताफ सरकवास व सलील रफिक सय्यदला अटक करण्यात आली. अशोक पाटील बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांनी दिली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर व सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह संजय पडवळ, संतोष पाटील, हिंदूराव केसरे, समीर कांबळे, तुकाराम राजिगरे, ओंकार परब, सुशील पाटील व पोलिस अंमलदार सुप्रिया कात्रट यांनी केली. नोटांची छपाई करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्यही पोलिसांनी छाप्यात जप्त केले आहे. प्रत्यक्षात संशयितांकडून छपाई केली जात नव्हती. केवळ छपाई करतो, असे दाखविले जात होते. फार्म हाउसवरसुद्धा त्यांनी फिर्यादी शेळके यांना असेच दाखविल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक कळमकर यांनी दिली.
three arrested kagal fake note
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements