मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय
तेलंगणा सरकारने रविवारी राज्याचे संक्षिप्त नाव ‘टीएस’ वरून ‘टीजी’ करण्याचा निर्णय घेतला (Telangana to be TG now) मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या राजपत्रात ‘टीएस’ऐवजी ‘टीजी’ वापरले जाणार आहे. २०१४ मध्ये तेलंगणाच्या निर्मितीनंतर तत्कालीन टीआरएस सरकारने राज्याचे संक्षिप्त नाव म्हणून ‘टीएस’ निवडले होते.
Telangana to be TG now
मागील सरकारने कोणतेही नियम पाळले नाहीत आणि टीआरएसशी मिळते-जुळते आपल्या इच्छेनुसार राज्याचे संक्षिप्त नाव ‘टीएस’ ठेवण्याचा निर्णय घेतला होता, असे मंत्री डी. श्रीधर बाबू यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर प्रसारमाध्यमांना सांगितले. दरम्यान, या निर्णयानंतर वाहन नोंदणी क्रमांकावर आता ‘टीजी’ हा उपसर्ग असणार आहे. याचबरोबर, विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान रेवंत रेड्डी यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.
तेलंगणातील लोकांच्या भावना प्रतिबिंबित करण्यासाठी प्रतिमा बदलण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. तसेच, ‘जय जय हो तेलंगणा’ हे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, सर्व हितधारकांशी सल्लामसलत करून नवीन राज्य चिन्हाची डिझाइन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. राज्य विधानसभेचे अधिवेशन ८ फेब्रुवारीपासून घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. यामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणाला मान्यता देण्यात आली.
Telangana to be TG now
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements