Bhimgad Wildlife Sanctuary
Govt proposes to rehabilitate villagers in Bhimgad
बेळगाव—belgavkar—belgaum : भीमगड अभयारण्यातील लोकांना योग्य व समाधानकारक भरपाई देऊन त्यांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर केले जाईल, अशी माहिती वन व पर्यावरण मंत्री ईश्वर खंडे यांनी दिली. सोमवारी रात्री विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज आटोपल्यानंतर त्यांनी वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तळेवाडी ग्रामस्थांची भेट घेऊन म्हणणे ऐकून घेतले (Bhimgad Wildlife Sanctuary is a protected area in the Western Ghats, in Khanapur Taluk of Belgaum)
Fund allocation for voluntary relocation of Karnataka’s Bhimgad sanctuary villages soon
ग्रामस्थांशी बोलताना Forest, Ecology and Environment Minister Eshwar B Khandre म्हणाले, प्रत्येक कुटुंबाला 15 लाख रुपयांची भरपाई देण्यासाठी सरकार तयार आहे. वन निवासींनी स्वयंप्रेरणेने स्थलांतरासाठी संमती दर्शवावी असे आवाहनही त्यांनी केले. सद्यस्थितीत भीमगड अभयारण्याच्या अखत्यारीत १३ वाड्या व वस्त्या आहेत. त्यात ७५४ कुटुंबातून ३,०५९ लोक वास्तव्य करतात. त्यामध्ये १,५३० पुरुष आणि १,४४३ महिला आहेत. सर्व कुटुंबे स्थलांतरासाठी तयार आहेत अशाच गावांचे स्थलांतर करण्यासाठी पुनर्वसन भरपाई देण्यासाठी कार्यवाही हाती घेण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
वन निवासींच्या स्थलांतरासाठी देण्यात येणारी भरपाईची रक्कम अपात्र लोकांना वितरित होऊ नये याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. तसेच संरक्षित जंगलाच्या बाहेर जमीन खरेदी करुन वन निवासींनी नवे जीवन सुरु करावे. यासाठी भरपाईपोटी मिळणारी रक्कम बँकेत ठेवीच्या स्वरुपात ठेवावी, अशी सूचना त्यांनी ग्रामस्थांना केली (each family would get Rs 15 lakh compensation for rehabilitation as per the National Tiger Conservation Authority (NTCA) guidelines.)
वनमंत्र्यांच्या भेटीसाठी काही महिला घनदाट जंगलातून चालत जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्याशी संवाद साधून वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल वनमंत्र्यांनी माहिती घेतली. त्यांनी म्हादई नदीपात्राची पाहणी करुन हेमाडगा येथील भीमगड वन्यधामात अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
गावे आणि कुटुंबाची संख्या अशी :
कोंगाळा – ६३, पास्तोली ३६, गवळीवाडा – ९०, अबनाळी – ८१, जामगाव – ८२, हेमडगा १२८, तळेवाडी – १३, देगाव – ३१, पाली – ७३, मेंडील – ४०, कृष्णापूर १२, होल्डा – ७ आणि आमगाव – ९८ कुटुंबे आहेत. यामध्ये १५३० पुरुष, १४४३ महिला असे एकूण ३०५९ लोक भीमगड अभयारण्यात राहतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक ब्रिजेशकुमार दीक्षित, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक कुमार पुष्कर, बेळगाव विभागाचे मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण, उपवनसंरक्षक मारिया ख्रिस्तूराजा, साहाय्यक वनसंरक्षक सुनीता निंबरगी आदी उपस्थित होते.
#BhimgadWildlifeSanctuary #WildlifeConservation #KarnatakaForests #EcoTourism #Biodiversity #NatureProtection #SustainableLiving #WildlifeProtection #ForestMinister #EnvironmentalAwareness #RelocationPlan #CommunitySupport #WildlifeHabitat #KarnatakaWildlife #NatureLovers #ConservationEfforts #ForestEcosystem #RuralDevelopment #WildlifeRescue #KarnatakaGovernment
rehabilitate villagers in Bhimgad
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements