पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या हिमायत बेगला मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. पण हा जामीन त्याला नाशिकच्या दहशतवादी कारवायांप्रकरणी देण्यात आला आहे. (Pune German Bakery blast case : Bombay High Court grants bail to Mirza Himayat Baig after 13 years)
हिमायत बेगवर नाशिक इथं दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरुन UAPA अर्थात बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडं या प्रकरणाचा तपास असून बेगवर लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी दहशतवाद्यांची नियुक्ती करण्याचं काम करत असल्याचा आरोप आहे.
दरम्यान, पुण्यात 13 फेब्रुवारी 2010 रोजी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरी बाहेर बॉम्बस्फोट घडवून आणला गेला होता. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 60 हून अधिक जण जखम झाले होते. या स्फोटाचा सूत्रधार हा हिमायत बेग हाच होता. या जर्मन बेकरी स्फोट प्रकरणी हिमायत बेगवर आरोप सिद्ध झाल्यानं त्याला पुण्याच्या सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. पण अपिलानंतर हायकोर्टानं त्याची फाशी रद्द करुन ती जन्मठेपेत बदलण्यात आली होती. तसेच कट रचणे आणि बॉम्ब ठेवणे या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements