Pralhad Joshi on BPL Card
हमी योजना हाताळण्यास असमर्थ असल्याने बहुतांश बीपीएल कार्ड रद्द
बेळगाव @कर्नाटक : राज्य काँग्रेस सरकार हमी योजना हाताळण्यास असमर्थ असल्याने बहुतांश बीपीएल कार्ड रद्द करण्यात येत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला.
हुबळी येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. गरिबांना अन्यायकारक वागणूक देऊ नये. ते राज्यातील शिधापत्रिका का रद्द करत आहेत, हे मला माहीत नाही. पण, गरिबांवर अन्याय होता कामा नये. याबाबत राज्य सरकारने कार्यवाही करावी. राज्यातील किती शिधापत्रिका रद्द केल्या याची सविस्तर माहिती माझ्याकडे नाही. मात्र, राज्याचे अन्न पुरवठामंत्री मुनियप्पा यांच्याशी याबाबत बोलणार आहे, असे ते म्हणाले.
केंद्र सरकार ५ किलो मोफततांदूळ देत आहे. भारत सरकार देशातील लोकांना मोठ्या प्रमाणात अन्नसुरक्षा प्रदान करत आहे. तसेच राज्यातील दारिद्रयरेषेखालील कार्डधारकांना ५ किलो मोफत तांदूळ पुरवठा करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मला माहित नाही की, सरकार राज्यातील एमपीआय आणि एचपीआय कार्डे का रद्द करत आहे? मात्र, काँग्रेसला नियोजित हमी योजनांची पूर्तता करता येत नाही. एकामागून एक हमी योजनांसाठी हे करत असल्याचे दिसून येत आहे. १० किलो तांदूळ देण्याची घोषणा केली. तरीही देत नाही. केंद्रानेच दिलेला पाच किलो तांदूळ ते वाटप करीत आहेत. तोही सर्वांना दिला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
शक्ती योजनेनंतर राज्यातील अनेक भागांत बसेसही नीट धावत नाहीत. अनेक मार्गांवरली बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यांच्यामुळे चालक व व्यवस्थापकांना योग्य पगार मिळत नाही. गृहलक्ष्मी योजनेचे २००० रुपये अनेक महिलांपर्यंत पोहोचतही नाहीत. युवा निधी अंतर्गत बेरोजगारांच्या एका ही खात्यात पैसे जमा झाले नसल्याचा आरोपही प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केला. गृहज्योती योजनेतही एकीकडे मोफत वीज देऊन दुसऱ्या मार्गाने वीज शुल्क ७ रुपयांपर्यंत वाढवले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. दूध आणि दारूचे भाव वाढले. मुद्रांक शुल्क वाढले. त्यामुळे सर्वच भाव वाढले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
Pralhad Joshi on BPL Card
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements