हिंदू याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल
‘ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर आधी हिंदू मंदिर होतं’: पुरातत्त्व विभाग
Court grants permission to Hindu side to offer prayers in Gyanvapi Mosque’s sealed basement : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याची परवानगी वाराणसी जिल्हा कोर्टाने दिली आहे. पुरात्व विभागाच्या सर्वेक्षणात मशिदीच्या परिसरात मंदिर असल्याचे पुरावे सापडले होते. व्यास कुटुंबीयांना मशिदीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे (Varanasi court allows Hindu side to pray in southern cellar of Gyanvapi Mosque)
वाराणसीतील ज्ञानवापी तळघरात ही पूजा होणार आहे. जिल्हा न्यायालयाने हा आदेश दिला आहे. हिंदू याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल देण्यात आला. हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, व्यास कुटुंबीय आता तळघरात पूजा करणार आहेत. हिंदू पक्षाने व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी मागितली होती. सोमनाथ व्यास यांचे कुटुंब 1993 पर्यंत तळघरात पूजा करत होते. 1993 नंतर तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशावरून तळघरातील पूजा बंद करण्यात आली. 17 जानेवारी रोजी व्यासजींचे तळघर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले. एएसआयच्या सर्वेक्षणाच्या कारवाईदरम्यान तळघर स्वच्छ करण्यात आले. काशी विश्वनाथ ट्रस्ट अंतर्गत तळघरात पूजा केली जाणार आहे.
ज्ञानवापी मशीद संकुलाच्या परिसराचा वैज्ञानिक अभ्यास, तिथल्या स्थापत्य अवशेषांचा अभ्यास, वैशिष्ट्ये, कलावस्तू, शिलालेख, कला आणि शिल्प यांच्या आधारावर असं म्हणता येईल की सध्या असलेल्या मशिदीच्या आधी याच जागेवर एक हिंदू मंदिर होतं. सध्या तिथे असणाऱ्या वास्तुशिल्पांचे अवशेष, मध्यवर्ती कक्षात असणारे कर्ण रथ आणि प्रति रथ, भिंतींवरच्या सुशोभित मोल्डिंग्ज, पश्चिमेकडील भिंतीवर तोरण बांधण्यात आलेलं एक मोठं प्रवेशद्वार, तिथे असणारं एक छोटं प्रवेशद्वार आणि पक्षी आणि प्राण्यांचं कोरीव काम या सगळ्या गोष्टींवरून हे हिंदू पद्धतीचं बांधकाम असल्याचं दिसतंय. कला आणि स्थापत्यशास्त्राच्या आधारावर, सध्या असलेलं ही बांधकाम एखादं हिंदू मंदिर म्हणून ओळखलं जाऊ शकतं.
permission to offer prayers in Gyanvapi Mosque
permission to offer prayers in Gyanvapi Mosque
permission to offer prayers in Gyanvapi Mosque
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements