ते अनेकवेळा स्वत:चीच खिल्ली उडवताना दिसतात
नागालँडचे पर्यटन मंत्री तेमजेन इम्रा अलॉन्ग आपल्या वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. Nagaland minister Temjen Imna Along अनेकवेळा स्वत:चीच खिल्ली उडवताना दिसतात. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे त्यांनीच हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते एका तळ्यात अडकल्याचं दिसत आहेत. यातून बाहेर निघण्यासाठी ते प्रयत्न कराताहेत पण त्यांना ते सहज शक्य होत नाही.
तळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांचे सहकारी त्यांना मदत करतात. पण, वजन जास्त असल्याने त्यांना देखील खूप मेहनत घ्यावी लागते. यावेळी त्यांचे सहकारी या प्रकाराचा आनंद घेताना दिसत आहेत. खूप प्रयत्न करुन काहीवेळाने ते स्वत:च तळ्याच्या बाहेर निघतात. तेमजेन इम्रा अलॉन्ग हे स्वत:चीच फिरकी घेत असल्याचं यातून दिसून येत आहे.
तळ्यात अडकडले तेमजेन इम्रा अलॉन्ग म्हणतात की, मी एक मोठा मासा आहे. मला माहिती नव्हतं की तळे इतके मोठे होते. पोटाच्या साहाय्याने ते हळू-हळू बाहेर निघतात. त्यांच्या संपूर्ण अंगाला चिखल लागलेला दिसत आहे. तळ्याच्या बाहेर येऊन ते खुर्ची मागवतात आणि त्यात आरामात बसतात. हे सर्व खेळीमेळीच्या वातावरणात होत असल्याचं दिसतं. इम्रा हे नागालँड राज्य सरकारमध्ये पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री आहेत. त्यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की, आज जेसीबीची परीक्षा होती. गाडी खरेदी करण्याआधी एनसीपीए रेटिंग जरून पाहा कारण यात तुमच्या जिवाचा प्रश्न आहे. या व्हिडिओला लोकांकडून मोठ्या प्रमाणात पसंदी मिळत आहे. लोक यावर प्रतिक्रिया देखील देत आहेत. दरम्यान, इम्रा अनेकदा काहीना काही पोस्ट करत असतात. लोकांना त्यांचा हा थट्टा करणारा स्वभाव आवडतो.
Aaj JCB ka Test tha !
Note: It's all about NCAP Rating, Gadi Kharidney Se Pehley NCAP Rating Jarur Dekhe.
Kyunki Yeh Aapke Jaan Ka Mamla Hain !! pic.twitter.com/DydgI92we2
— Temjen Imna Along (@AlongImna) February 10, 2024
Nagaland minister Temjen Imna Along viral video struggling to get out of water
Nagaland minister viral video stuck in muddy pond
Nagaland minister viral video stuck in muddy pond
Nagaland minister viral video stuck in muddy pond
Nagaland minister viral video stuck in muddy pond
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements